Friday Tips : वैदिक हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस विशेष मानला जातो. धनची देवता माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित आहे. या दिवशी विधिपूर्वक माता लक्ष्मीची पूजा केल्यास माता लक्ष्मीचा अर्शीवाद प्राप्त होतो. ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. त्यानुसार, ज्योतिष शास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही उपाय सांगण्यात आले आहे. त्यानुसार आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही 5 उपायांबद्दल माहीती देणार आहोत. यापैकी कोणताही एक उपाय केल्याने मातेची विशेष कृपा प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहीती.
अखंड ज्योत
तुम्हाला कष्ट करुन देखील आर्थिक चणचण भासत असेल तर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर 11 दिवस अखंड ज्योत लावावी. त्यानंतर 11 कन्येला भोजन द्या. या उपायाने धन संबंधी समस्या दूर होत आर्थिक समृद्धी लाभते.
लाल वस्त्र अर्पण करा
माता लक्ष्मीला प्रसंन्न करण्यासाठी शुक्रवारी देवीला लाल वस्त्र अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
भगवान विष्णूची पूजा
आर्थिक समृद्धीसाठी शुक्रवारी भगवान विष्णूची पूजा करा. भगवान विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दर शुक्रवारी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करा.
खीरचा नैवेद्य
भगवान लक्ष्मीनारायण आणि माता लक्ष्मीला खीरचा नैवेद्य अर्पण करा. या उपायाने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होतात आणि धनलाभ होतो.
कमळाचे फूल अर्पण करा
लक्ष्मी मातेला कमळाचे फूल प्रिय आहे. त्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीला फुले अर्पण करा. शक्य असल्यास मातेला कमळाचे किंवा इतर लाल फुले अर्पण करावीत.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)