Bhusawal Earthquake: जळगाव जिल्हयातील (Jalgaon News) भुसावळ, सावदा परिसरात आज 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.35 वाजता भुकंपाचा (Bhusawal Earthquake) सौम्य धक्का जाणवला. 3.3 रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भुकंपाची (Earthquake) होती. जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 कि.मी. खाली हा भुकंप झाला. आतिशय सौम्य तीव्रतेचा हा भुकंप आसल्याने कुठल्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल (Aman Mittal) यांनी भुसावळ येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरीकांना सर्वतोपरी मदत करण्यास प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
भुकंपाच्या (Bhusawal Earthquake) पार्श्वभूमिवर माहती जाणून घेण्यासाठ तसेच आधिकाऱ्याना सुचना देण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) भुसावळात आले होते. यावेळी, तहसील प्रशासन, नगरपालिका प्रशासन, बांधकामसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भुकंपाचा (Bhusawal Earthquake) हा धक्का सौम्य स्वरुपाचा असल्याने कुठल्याह प्रकारचे नुकसान झालेले नाही. रेल्वे, दिपनगर प्रशासन, हतनूर प्रकल्प, वाघूर प्रकल्पासह इतरत्र देखील याचा परीणाम झाला नाही. रेल्वेसह (Indian Reilway) सर्व प्रकल्पाचे संचलन सुरळीत सुरु आहे. तरी खबरदारी म्हणून आपातकालीन परीस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून आपातकालीन पथके अलर्ट आहेत. तसेच नगरपालिकेच्या माध्यामातून शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान, भुकंपाच्या संदर्भात शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु असून अवश्यकता भासल्यास शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अवश्यक ती पाऊले उचलली जाणार आहे.
शाळांना त्याच्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार
भुकंपाच्या (Bhusawal Earthquake) पार्श्वभूमिवर सर्व प्रशासन, शाळा, महाविद्यालये आदींना अवश्यक त्या सुचना करण्यात आल्या आहे. आज आणि उद्या शाळा सुरु ठेवायची की नाही याबाबत निर्णय घेण्याचे आधिकार त्याच्या स्तरावर असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगीतले.