LIC ADO Recruitment 2023: नोकरच्या शोधात (Sakari Nauki) असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय जिवन विमा निगममध्ये (LIC) मेगा भरती होत आहे. LIC ने अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर (ADO) पदासाठी अर्ज मागवले असून सरकारी नोकरी शोधणार्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रीयेंतर्गत LIC ने 9394 हून अधिक जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. आठ विभागांमध्ये ही पदे भरली जातील. LIC ADO नोंदणी प्रक्रिया LIC च्या अधिकृत पोर्टलद्वारे केली जाईल. LIC ADO 2023 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार LIC पेजला भेट देऊ शकतात. या पदासाठी अर्ज 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत उपलब्ध असेल.
शैक्षणिक पात्रता
LIC ADO पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार पदवीधर असावेत आणि उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक) त्यानंतर ऑनलाइन परीक्षा (मुख्य) आणि मुलाखत होईल. LIC या भरती प्रक्रीयेंतर्गत कर्मचारी श्रेणी आणि एजंट श्रेणीतील अशा दोन गटात उमेदवारांची भरती करत आहे ज्यांनी पूर्वी कर्मचारी म्हणून काम केले होते.
LIC ADO पगार
या भरती प्रक्रीयेंतर्गत शिकाऊ कालावधी दरम्यान – LIC कर्मचारी श्रेणीतून निवडलेल्या उमेदवारांना वगळून प्रति महिना रु.51500 स्टायपेंड देणार आहे. प्रशिक्षणानंतर विभागातील मुख्यालयातील परिविक्षा विकास अधिकारी यांना वेतन, भत्ते आणि लागू नियमांनुसार इतर लाभ मिळेल. प्रोबेशनरी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्यावर, मूळ वेतन रु.35650 प्रति महिना असेल.
अधिकृत वेबसाइटवर भेट दिल्यानंतर थेट लिंकद्वारे उमेदवार उत्तर, उत्तर मध्य, मध्य, पूर्व, दक्षिण मध्य, दक्षिण पश्चिम आणि पूर्व मध्य यासह सर्व आठ झोनसाठी LIC ADO Recruitment 2023 PDF डाउनलोड करू शकतात.