Muktainaiar News : मुक्ताईनगर येथील तालुका क्रीडांगण येथे “श्रीराम चषक” या चार दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी दि.५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन केले . तसेच उद्घाटन झाल्यानंतर सर्व स्पर्धक क्रिकेट पटू व संघांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार महोदयांनी मैदानात फलंदाजी करत सर्वांना अश्चर्यचकीत केले.
यांची होती उपस्थिती होती
विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, तालुका प्रमुख छोटू भोई, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे , शहर संघटक वसंत भलभले ,नगरसेवक संतोष कोळी, अविनाश नाईक, सुभाष सनांसे, सचिन बोरोले, संतोष माळी, प्रफुल्ल पाटील यांचेसह स्पर्धक संघातील असंख्य क्रिकेट पटू खेळाडू उपस्थित होते.