Ravivar Che Upay: सुख-सुविधा युक्त जीवन हे प्रत्येकाला हवं असतं. यासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. यात काहींना सहज यश मिळते तर काहींच्या य मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हालाही कष्ट करुन यश मिळत नसेल तर ही माहीती तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. जीवनात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय (Jyotish Remedy) सांगण्यात आले आहेत. त्यानुसार रविवारी (Sunday Remedies) काही गोष्टी टाळल्या पाहिजे, असे ज्योतिष शास्त्र सांगतं. असे केल्याने कारात्मक फळ प्राप्त होते.
तांब्याची वस्तू
भगवान सूर्य देवाची कृपा प्राप्त करायची असल्यास रविवारी तांब्याच्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये.
काळे कपडे
ज्योतिष शास्त्रानुसार, रविवारी निळा, काळा, आणि करड्या रंगाचे कपडे घालू नये. यासह शक्य असल्यास बूट घालणे देखील टाळावे.
मीठ
रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. सूर्य देवाची कृपा लाभण्यासाठी रविवारी तेल आणि मिठाचे सेवन करू नये.
केस कापू नका
रविवारी म्हटला म्हणजे सुटीचा दिवस. त्यामुळे बरेच जण या दिवशी, दाढी-केस कापतात, मात्र असे करणे खूप चुकीचे आहे. ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी केस कापू नये. यासह रविवारी तेलाने मालिश देखील करू नये.
दूध जळू देऊ नका
रविवारी दूध तापवताना किंवा इतर कोणत्याही प्रकारे दूध जळणार नाही याची काळजी घ्यावी. रविवारी दूध जळू देऊ नका.
तामसी भोजन टाळा
सुर्यदेव हे ऊर्जेचे प्रतिक आहे. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. सूर्यदेव हे एकमेव देव आहे ज्यांचे मानवाला दररोज दर्शन होते. त्यामुळे रविवारी मांसाहार आणि मद्यापासून दूर राहावे.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)