चर्चा तर होणारचं ! यात्रेत ‘सोन्या’ बैलाची हवा
; रोजचा खुराक अन् किंमत पाहून डोळे😳फिरतील
सोलापूरचे (Solapur ) ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा यात्रोत्सव सद्यस्थितीत सुरू आहे. सदरील यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात विविध पीके, फळे, फुले तसेच शेतीची साहित्य ,अवजारे यासोबतच पशुधनही यात्रे करुंना पाहायला मिळत आहे.
या मध्ये खिलार(Khilar) जातीचा सोन्या बैल विषेश आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर काय आहे या सोन्याची खासियत अन् किती आहे त्याची किंमत जाणून घ्या सविस्तर मुक्ताई वार्ता News वेबसाईटच्या माध्यमातून
सोलापूर शहरात श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या कृषी प्रदर्शनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरलेला आहे तो म्हणजे ‘सोन्या बैल’. सोन्या हा भारत देशातील सर्वात उंच आणि देखणा खिलार जातीचा बैल असल्याचा दावा त्याच्या मालकाने केला आहे. 6.30 फूट उंच आणि 9.30 फूट लांबी असलेल्या या सोन्याची किंमतही त्याच्या नावाप्रमाणेच म्हणजेच (Gold) 🪙 सोन्यापेक्षा महाग आहे. त्याची किंमत ऐकून आश्चर्यच होईल.
तर या 5 वर्षाच्या सोन्याची किंमत 41 लाख.😳
सांगलीचे डॉ.विद्यानंद अवटी हे या सोन्या बैलाचे मूळ मालक असून अवघ्या 5 वर्षांचा असलेल्या या सोन्याची बाजारभावामध्ये 41 लाख रुपये इतकी भली मोठी किंमत आहे. मात्र कोटी रुपयांमध्ये जरी किंमत मिळाली तरी सोन्याला विक्री करणार नसल्याचे त्याच्या पालक असलेल्या मालकाचे म्हणणे आहे.
अबब सोन्याचा रोजचा खुराक वाचाच एकदा
या सोन्याचा जसा रुबाब अन् थाट आहे. अगदी तसाच त्याचा खुराकही दणकट असून. (Khilari) बैल असलेल्या सोन्याला दररोज 7 प्रकारच्या कडधान्यांची भरड, 2 लिटर गीर गायीचे दूध, 2 किलोमीटर शेंगा पेंड, 200 मिली करड्याचे तेल, 6 गावरान अंडी, दिवसातून 5 ते 6 वेळा वैरण असा त्याचा रोजचा आहार आहे.तर इतकेच नव्हेतर सोन्या बैलाला दररोज गरम पाणी आणि ब्रँडेड शांम्पूने अंघोळही घालावी लागते हे विशेष