शिवजयंती दिनी, मुक्ताईनगर येथे होणार लाक्षणिक उपोषण, शेतकऱ्यांनी दिला इशारा !!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात रयत ही राम राज्याप्रमाणे सुखाने नांदत होती. अगदी शेतकऱ्यांच्या काडीला ही धक्का लागू नये अशी सक्त ताकीद शिवरायांनी त्यांच्या सैन्याला दिली होती. अशा महान युगपुरुष छञपती शिवरायांचा जन्मोत्सव दि.19 फेब्रुवारी रोजी साजरा होत असून याच दिवसाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध प्रकल्पातून संपादित होणाऱ्या जमिनी संदर्भात त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.




त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर शहराला लागून असलेल्या शेतजमिनी ज्या की भविष्यात रहिवासी प्रयोजनार्थ N.A होऊ शकतात अशा जमिनी व काही जमिनी या अगोदरच N.A झालेल्या आहेत अशा क्षेत्रातून बोदवड उपसा सिंचन योजनेतील सुमारे 2.5 मीटर व्यासाचे प्रत्येकी दोन पाईप लाईन साठी महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या अधिनियम 2018 नुसार शेतकऱ्यांच्या जमिनीचे वापर हक्क संपादन व अधिग्रहण करून त्याबद्दल त्यांना योग्य न्याय नुकसान भरपाई न देता वापर हक्काचे शासनाकडून संपादन केले जात आहे.
याबाबत संबंधित शासकीय विभागाकडे जमीन धारकांकडून तालुका ते मंत्रालय अशा सर्व स्तरावर सातत्याने अर्ज विनंत्या करून अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून विनंती अर्ज देवूनही जमीन धारकांना संबंधितांकडून योग्य दिलासा मिळाला नसून नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही.त्यामुळे संबंधित जमीन धारक शेतकरी बांधव व त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झालेले असून त्यांनी छञपती शिवरायांचा जन्मोत्सव दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा होत असून याच दिवसाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध प्रकल्पातून संपादित होणाऱ्या जमिनी संदर्भात त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर यांची आहेत नावे, सुभाष शुरपाटणे, चंद्रकांत शुरपाटणे, बदार खा दिलर खा, चंद्रकांत कोलते,रमणलाल जैन, सुगनचंद जैन,दिनकर पाटील, भागीरथी खेडकर, सुधाकर खेडकर, रघुनाथ महाजन, वामन भारसाके, पुंडलिक धनगर, तुकाराम चौधरी, चंद्रशेखर पुराणिक, नंदकिशोर पुराणिक, हितेंद्र जैन, नरेंद्र जैन, नारायण चौधरी, विद्या चौधरी, प्रभाकर चौधरी, भास्कर चौधरी, प्रकाश सरोदे, तुषार महाजन, प्रदीप बेंडाळे ,माधव त्र्यंबक पाटील, पुंडलिक पाटील, पांडुरंग कोलते, बाळू लक्ष्मण पाटील आदींनी दिला आहे इशारा …