Wednesday, July 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.

Admin by Admin
February 22, 2024
in मुक्ताई वार्ता
0
413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुक्ताईनगर येथील पुनर्वसित ४ थ्या टप्प्यातील ४१३ घरांना तसेच रावेर तालुक्यातील या गावातील घरांना मिळाला शासनाचा हिरवा कंदील
आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.
  हतनूर प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे अंशतः बाधित झाल्याने मुक्ताईनगर शहराचे चार टप्प्यांत पुनर्वसन करण्याचे नियोजन प्रशासनाने केलेले होते. पुनर्वसनातील पहिले तीन टप्पे पूर्ण झालेले आहेत तर उर्वरित चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील जूनेगावठाण परिसराचे पुनर्वसन गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री , पुनर्वसन मंत्री , पालकमंत्री,ग्रामविकास मंत्री जिल्हाधिकारी व  संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या समवेत मंत्रालयामध्ये वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या .त्यानुसार मुक्ताईनगर  शहरातील जूने गावठाणातील उर्वरित ४१३ घरांचे पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आता याला अंतिम स्वरूप आलेले असून राज्य शासनाच्या नियामक मंडळाने  याला मान्यता दिलेली असल्याचे व उर्वरित रखडलेल्या गावांचे देखील पुनर्वसन लवकरच होणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुक्ताईनगर शहरातील ४१३ घरांचे तसेच रावेर तालुक्यातील तापी व पूर्णा नदीवरील नागरिकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित घरांचे पुनर्वसन व्हावे यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून अधिवेशनात देखील लक्षवेधी मुद्दा उपस्थित करून आ.चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यानुसार  मांक- कासं/प्रशा/नियामक बैठक / (६७)/६५४/२०२४,दिनांक-१५/०२/२०२४ अन्वये एक परिपत्रक जारी झालेले असून त्यात म्हटले आहे की,तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ६७ वी बैठक दिनांक २८/१२/२०२३ रोजी दुपारी १२.१५ वाजता मा. उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री ना.देवेंद्र फडणवीस व मदत व  पुनर्वसनमंत्री अनिल पाटील,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील ,व लाक्षेवि तथा अध्यक्ष, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे बैठक संपन्न होती झाली.त्यानुसार
ठराव क्र-६७.१७- ठराव करण्यात येतो की, “हतनूर प्रकल्प (ऊर्ध्व तापी टप्पा-१) करीता जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे-मुक्ताईनगर (४१३ घरे) व रावेर तालुक्यातील (१) मौजे-नेहेते (१२८ घरे), (२) मौजे-वाघाडी (४६३ घरे), (३) मौजे- ऐनपूर (२५० घरे), (४) मौजे-भामलवाडी (१९९ घरे) यांचे संपादन व पुनर्वसन करण्यासाठी अनुक्रमे मुक्ताईनगर  रु.११०.०० कोटी, नेहते रु.२४.९३ कोटी, वाघाडी रु.१००.९३ कोटी, ऐनपुर रु.३९.०२ कोटी व भामलवाडी रु.२६.४९ कोटी असे एकुण रक्कम रु.३०१.३७ कोटी च्या खर्चास शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणे व त्यासाठी आवश्यक निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव नियामक मंडळाच्या शिफारशीसह शासनास सादर करण्यास नियामक मंडळाची मान्यता देण्यात येत आहे.”असे म्हटलेले आहे.
*********************************”*
१६६४ घरे बाधित
१९७५-७६ मध्ये हतनूरच्या बॅकवॉटरमुळे मुक्ताईनगर शहरातील १६६४ घरे बाधित झाली होती. त्यात बाजार गल्लीतील (३२८), देशमुख गल्ली (२३६), काजीपुरा (१४२), चाळीस मोहल्ला (१०४), वंजारवाडी व जोगीवाडा (१०३), पाटील गल्ली (१०२), धनगरवाड्यातील (११३)घरांसह अन्य भागातील एकूण १६६४ घरे बाधित झाली होती.
————-
पुनर्वसनाचे टप्पे असे
टप्पा क्रमांक    वर्ष    उठलेली घरे
पहिला        १९७६    ८८८
दूसरा        १९८६    १२३
तिसरा         २०१२    २४०
:::::::::::::::::::::::::::::::::::::::
एकूण            १२५१
चौथ्या टप्प्यात उर्वरीत ४१३ घरांचे पुनर्वसन होणार आहे.
Tags: 413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMonday Remedy In MarathiMuktainagar Newsआमदार चंद्रकांत पाटीलएकनाथ शिंदेगुलाबराव पाटीलदेवेंद्र फडणवीसमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

Symbolic hunger strike to be held in Muktainagar on Shiv Jayanti, farmers warned !!

Next Post

Mla.Chandrakant patil.

Admin

Admin

Next Post
Mla.Chandrakant patil.

Mla.Chandrakant patil.

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group