MS Dhoni Meets Team India: न्यूझीलंड क्रीकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. नुकतीच भारत आणि न्यूझलंड संघात (IND vs NZ) एकदिवसीय मालीका पार पडली. या एकदिवसीय मालिकेत टीम इंडयाने (Team India) न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला आहे. एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडीया आता किवींविरुद्ध तीन सामन्यांची T20I मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. आशातच बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडीओ शेअर केला आहे. बघूया काय आहे या व्हिडओत.
टीम इंडया आणि न्यूझलंड यांच्यात उद्यापासून तीन सामन्यांची T20I मालिका सुरु होत आहे. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना मोठे सरप्राईज मिळाले. नेमकं झालं असं की, भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी स्वतः स्टेडियमवर पोहोचला, ऐवढच नाही तर त्याने ड्रेसिंग रुममध्ये जात खेळाडू आणि संघातील इतर सदस्यांची भेट घेतली.
Look who came visiting at training today in Ranchi – the great @msdhoni! 😊#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
धोनीच्या या भेतीचा व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू त्यांच्या दिग्गज खेळाडूला चाहत्याप्रमाणे भेटताना दिसत आहेत. हार्दिक पांड्या आणि ईशान किशन हे देखील धोनीसोबत बोलताना दिसत आहेत. तर चहल, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलसारखे खेळाडू माहीकडे टक लावून पाहत होते. बीसीसीआई ने वीडियो शेयर करत ” बघा राचीमध्ये ट्रेनिंग दरम्यान कोण भेटायला आलं आहे. दिग्गज एमएस धोनी!” असे लिहीले आहे. धोनीचा हा व्हिडओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडओ पाहून लाईक आणि कमेंट देखील केले आहे.