फ्लॅट संस्कृतीमुळे गुढ्यांची उंची कमीअमरावती, 29 मार्च (हिं.स.)।साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीची पूजा करून नववर्षाचे स्वागत केले जाते. पूर्वीच्या काळी उंच-उंच गुढी उभारण्याची स्पर्धा असायची; परंतु आता फ्लॅट संस्कृती आल्याने गुढ्यांची उंची कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात रेडिमेड मिनी गुढी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. त्या ६० रुपयांपासून ते ३५० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा मागणी २० टक्क्यांनी वाढल्याने व्यावसायिक सांगतात.
रेडिमेड गुढी ही कमी जागेत उभारता येते. त्यामुळे छोटी काठी, छोटा तांब्या, नक्षीदार साडी आणि त्यावरील नाजूक सजावट अशी भुरळ पाडणारी गुढी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुकलेल्या लाकडापासून तयार केलेल्या छोट्याशा गुढ्या बाजारात उपलब्ध आहेत. सर्वात लहान ६० रुपयांची तर सर्वात मोठी ३०० ते ३५० रुपयांपर्यंतची गुढी आहे. गुढीसाठी विविध प्रकारचे कापड बाजारात नव्याने दाखल झाले आहेत. खणाचे कापड आणि पैठणी महिलांना आकर्षित करत आहे.
२०, २८ आणि ३६ इंच अशा स्वरूपातील कापड लहान-मोठ्या गुढीसाठी उपलब्ध आहेत. त्यांची किंमत २०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. मागणीत झाली वाढ पूर्वीच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांपासून रेडिमेड गुढीला मागणी वाढली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेने ही मागणी २० टक्के जास्त आहे. लहान गुढी देवा जवळ ठेवता येत असल्याने तिला मागणी आहे. – संजय पाटील, विक्रेता. पारंपरिक गुढ्यांचे यंदाही ठरणार आहे आकर्षण पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी शहरातील बाजारात दिसून येत आहे. यात मोची गल्ली, जवाहर गेट, अंबा मंदिर परिसर, राजापेठ, नवाथे, राजकमल चौक, इतवारा लहान, पण दिसायला सुंदर असलेल्या रेडिमेड गुढीला ग्राहकांची अधिक पसंती आहे. खणाचे कापड, सोनेरी लेस आणि सोनेरी गोंड्यांनी गुढीचे वस्त्र सजवले आहे.