उन्हाळ्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्याही कमी
अमरावती, 29 मार्च (हिं.स.)अमरावती व बडनेरावासीयांसाठी महत्त्वाची व उपयोगी उसारक्षित बडनेरा-नाशिकरोड मेमू गाडीला उन्हाळ्यामुळे ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी ही मेमू ३१ मार्चपर्यंतच प्रस्तावित होती. उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढते. ही बाब विचारात घेता मेमूला मुदतवाढ देण्यात आली आहे. बडनेरा स्थानकावरून सकाळी ११.०५ वाजता ही मेमू रवाना होते. त्यानंतर सायंकाळी ७.०५ वाजता नाशिक रोड येथे पोहोचते. त्यामुळे संतनगरी शेगांव, भुसावळ, नाशिक येथे जाण्यासाठी ही फारच सोयीस्कर गाडी असून सोबतच जवळचे स्थानक मुर्तिजापूर, अकोला, नांदुरा येथे जाण्यासाठीही उपयोगी आहे.
कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर (महाराष्ट्र) एक्सप्रेस क्र. ११०३९ कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस १ जूनपासून कोल्हापूर येथून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह निघेल. त्याचप्रमाणे गाडी क्र.११०४० गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस ३ जूनपासून गोंदिया येथून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह रवाना होईल. सुधारित संरचनेनुसार एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार या एक्सप्रेसला राहणार आहेत.पुणे येथे जाण्यासाठी सोयीस्कर राहणारमहाराष्ट्र एक्सप्रेस ही अमरावती, बडनेरावासीयांना शेगांव, पुणे येथे जाण्यासाठी सोयीस्कर गाडी आहे. पुणे येथे पहाटे ५ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेस पोहोचते.
त्यामुळे या महानगरात दिवसभर काही काम असेल तर ते पूर्ण करून रात्री १०.३० वाजता पुणे स्थानकावर येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसने परतीचा प्रवास सुरू करता येतो. बडनेरा स्थानकावर ती दु. १२ वाजताच्या सुमारास पोहोचते. त्यामुळे ही गाडी पुणे तसेच कोल्हापूरला जाण्यासाठी तर उपयोगी आहेच. सोबतच बडनेरा स्थानकावरून कोल्हापूरकडे महाराष्ट्र एक्सप्रेस दु. २ वाजताच्या सुमारास प्रस्थान करते. तसेच सायं. ४ वाजताच्या सुमारास संत नगरी शेगाव येथे पोहोचते. त्यामुळे अनेक भाविक प्रवासी महाराष्ट्र एक्सप्रेसला शेगांवकडे जाण्यासाठी प्राधान्य देत असतात.—————