Investment Tips: पैसा ही अशी गोष्ट आहे जी व्याक्तीला शेवटच्या क्षणापर्यंत लागते. त्यामुळे आपले म्हातारपण सुरक्षित राहावे आणि म्हातारपणात (Retirement Planning) पैशाची अडचण येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. तुम्हालाही सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला उत्पन्न हवे असल्यास एक सरकारी योजना (NPS Retirement Planning) तुमच्या कामी येईल. या योजनेत (NPS) गुंतवणूक केल्यास तुम्ही सेवानिवृत्तीनंतर कुठलीही नोकरी आणि व्यवसाय न करता दरमहा 21,000 रुपये मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही योजना.
नॅशनल पेन्शन सिस्टम
या लेखात आपण ज्या योजनेविषयी बोलणार आहोत त्या योजनेचे नाव आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS. ही एक सरकारी पेन्शन योजना असून यात इक्विटी आणि डेट दोन्ही साधनांचा समावेश आहे. या योजनेला सरकारकडून हमी मिळते. निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळवण्यासाठी NPS योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
तुम्हाला म्हातारपणात तुम्हाला पैशाची अडचण येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही आधीच नियोजन करायला हवे. म्हणजे तुम्ही कमावते व्हाल त्या दिवसापासूनच तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात केली पाहिजे. जितक्या लवकर बचत करायला सुरुवात कराल तितकेच जास्त पैसे तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीपर्यंत मिळतील. समजा जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी NPS मध्ये दरमहा 1000 रुपये जमा केले, तर निवृत्तीच्या वयापर्यंत तुमचे एकूण जमा झालेले योगदान यासह तुम्हाला यामध्ये 10 टक्के वार्षिक परतावा मिळेल.
दरमाह 21, 000 रुपये पेन्शन
यासह जर NPS ग्राहकाने गुंतवणुकीतील 40 टक्के कॉर्पसचे वार्षिकीमध्ये रूपांतर केले तर त्याचे मूल्य 42.28 लाख होईल. तर मासिक पेन्शन 10 टक्के वार्षिक दराने 21,140 रुपये असू शकते. यासह तुम्हाला सुमारे 63.41 लाख रुपयांची एकरकमी रक्कम देखील मिळेल. या योजनेमध्ये गुंतवणुकीचे तीन पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे कुठे गुंतवावे हे निवडता येते. यात इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज आणि सरकारी रोखे हे पर्याय आहे.
2 लाखांपर्यंत होईल कर बचत
या योजनेत गुंतवणूकदार मॅच्युरिटी रकमेचा योग्य वापर करून मासिक पेन्शनची रक्कम वाढवू शकतो. या योजनेच्या माध्यमातून आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सूट मिळेल. त्यानुसार NPS च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. NPS ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सुकन्या समृद्धी योजना प्रमाणेच आहे.