Mangalwar Che Upay : सुखी आणि समृद्ध जीवनासाठी ज्योतिष शास्त्रात (jyotish tips) अनेक अध्यात्मिक उपाय सांगण्यात आले आहे. त्यानुसार, मंगळवारचे काही उपाय (Mangalwar Che Upay) सुचवण्यात आले आहे. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते. मंगळवारचा दिवस हा भगवान हनुमानजी यांना समर्पित आहे. या दिवशी विधिवत पूजनासह व्रत केल्याने कुंडलीतील मंगळ दोष (Mangal Dosh Upay) कमी होत व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात. यासह व्यक्तीच्या मन-सन्मान, बल, साहस आणि पुरुषार्थमध्ये वृद्धी होते. सुयोग्य सनातन प्राप्तीसाठी देखील हे व्रत लाभदायक मानले जाते.
सलग 21 मंगळवारपर्यंत करा व्रत
हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी सलग 21 मंगळवारपर्यंत व्रत करावे. असे केल्याने विशेष लाभ होतो. या दिवशी सायंकाळी देखील हनुमानजींचे विधिवत पूजन करत आरती करावी. जर 21 व्रताचा संकल्प केला असेल तर 22 व्या मंगळवारी विधिवत पूजन करत उद्यापन करावे.
असे करा व्रत
कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. हनुमानजी यांना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ब्रह्म मुहूर्तला उठून स्नान आदींपासून निवृत्त व्हावे. त्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. लाला कपडे परिधान करून हातात जल घेत व्रताचा संकल्प करा. हनुमानजींच्या समोर साजूक तुपाचा दिवा लावत फुलाहार किंवा फुलं अर्पण करावे. समोर चमेलीच्या तेलात भिजलेला कापूस ठेवावा. आता मंगळवार व्रताची कथा वाचावी. त्यानंतर हनुमान चालीसा आणि सुंदर कांड पाठ करावा. शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा. सर्वांना प्रसाद वाटून स्वतः देखील प्रसाद घ्यावा. तसेच दिवसभरात फक्त एकच वेळा भोजन करावे.
सायंकाळची पूजा
भगवान हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर पूजा करावी. असे केल्यान् भगवान हनुमान लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे मंगळवारी मंदिरात किंवा घरी हनुमानजींच्या मूर्ती समोर आसनावर बसून मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. यासोबत अगरबत्ती लावून पुष्प अर्पण करावे. शेंदूर, चमेलीचे तेल अर्पण करावे. मंगळावर मंगळ ग्रहाचा वार देखील मानला जातो. या दिवशी हनुमानजीची पूजा केल्याने मंगळदोषही दूर होतो.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)