Heart Attack Signs: सध्याच्या धावपळीच्या या युगात अनियमित जिवनशैली आणि चुकच्या आहार पद्धतीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. यात हृदयविकाराची समस्या (Heart Attack) वाढीस आली आहे. जगात दरवर्षी लाखो लोकांना हृदयविकाराची समस्या (Heart Disease) निर्माण होत यातील बरेच लोक आपला जीव गमावत आहे. हृदयविकाराची समस्या कोणालाही उद्भवू शकते. एखाद्या तंदरुस्त व्यक्तीला देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराची समस्या निर्माण होण्यापूर्वी आपले शरीर काही संकेत देतं. त्यानुसार जाणून घेऊया हृदयविकाराचे लक्षणं.
हृदयाच्या आरोग्यात थोडी जरी समस्या निर्माण झाली तर शरिर आपल्याला त्याचे संकेत देत असतं. यात एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे वेदना. तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात जर वेदना होत असेल तर ते काळजीचं कारण ठरतं. त्यानुसार जाणून घेऊया हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी होणाऱ्या वेदनांविषयी.
या अवयवांमध्ये होतात वेदना
- हृदयासंबंधी आजार जडण्यापुर्वी शरीरात दिसणारं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे, याशिवाय शरीराच्या इतर भागातही वेदना होतात.
- हृदयविकारातील प्रमुख लक्षणांपैकी एक म्हणजे पोटाच्या वरच्या भागावर दुखणे जाणवते.
- जबडा आणि मानेत दुखणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण आहे.
- हृदयातील कोणत्याही प्रकारच्या समस्यांमुळे व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या खांद्यावर वेदना सुरू होते.
- यासह उजव्या आणि डाव्या हातामध्ये देखील वेदना होतात.
हृदयविकाराच्या समस्येमुळे छाती, खांदे आणि कंबरेच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो. जर तुमची पाठ दुखत असेल तर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. यासह थकवा आणि घाम येणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण आहे. यापैकी कोणतेही लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
महिलांनी अधिक काळजी घेणे गरजेचे
महिला असो की पुरुष कोणालाही हृदयविकाराची समस्या निर्माण होवू शकते. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, जर एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत महिलांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)