Cholesterol Cure: शरिरात कोलेस्ट्रॉलची पातळा बिघडल की आरोग्यविषयी अनेक समस्या निर्माण होतात. उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या त्यात गंभीर असते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे (High Cholesterol) नसांमध्ये चरबी वाढत ब्लॉकेजची समस्या निर्माण होते. कारण,खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल (LDL) नसांमधील रक्तप्रवाहवर परिणाम करणारा ठरतो. शरिरात रक्ताभिसरण प्रक्रीयेत अडचण आल्यास रक्तवाहिन्यांमध्ये सूज, कडकपणा आणि चरबीमुळे हृदयावर दाब येतो. हृदयावर दाब आल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्याता वाढते. उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येत तुम्हाला विषेश काळजी घेण्याची गरज आहे. या समस्येत ड्रॅगन (Dragon Fruit Health Benefits) फळ म्हणजेच ‘कमलम’ हे फळ पायदेशर ठरते.
दिसायला अकर्षक असे ड्रॅगन फळ गुलाबी आणि हिरव्या रंगाचे असून ते आरोग्यसाठी खूप फायदेशीर ठरते. औषधी गुणधर्माने समृद्ध हे फळ नसांमधील ब्लॉकेज दूर करतं. हे फळ रक्तवाहिन्यांना आराम देत गोठलेली चरबी वितळवण्यास उपयुक्त ठरतं.
रोग प्रतिकारशक्ती
ड्रॅगन (कमलम) फ्रूटमध्ये लोहाचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने गर्भवती महिलांमध्ये अॅनिमियाची समस्या निर्माण होत नाही. यासह या फळातील व्हिटॅमिन-सी गर्भवती महिलांची रोग प्रतिकारशक्ती वाढवते. तसेच त्वचेची चमक देखल वाढते.
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी फायदेशीर
ड्रॅगन फ्रुटमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड्ससह पॉलिअन सॅच्युरेटेड फॅट असे घटक आढळतात. ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. पोटाशी संबंधित आजार तसेच वजन कमी करण्यासाठी देखील हे फळ फायदेशीर आहे.
मधुमेहाच्या समस्येत दिलासा
मधुमेहाच्या समस्येत ड्रॅगन फ्रूट लाभदायक ठरतं. या फळाच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होत या आजारात दिलासा मिळतो.
सूज कमी करते
ड्रॅगन फ्रुट मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी आणि शारीरिक वेदनांवर मात करण्यासह फ्री रॅडिकल्समुळे निर्माण होणारी सूज कमी करत हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)