राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष व चिटणीस पदांवर यांची नियुक्ती !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील तालुकाध्यक्ष व इतर पदांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.
जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी त्यांच्या भुसावळ येथील कार्यालयात तालुकाध्यक्षपदी विजय मधुकर सोनार, कार्याध्यक्षपदी गोपाळराव पाटील (सुळे), चिटणीसपदी विनोद विठ्ठल पाटील (शेमळदे) यांची नियुक्ती करून सदरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा मुक्ताईनगर संगायो समितीचे अध्यक्ष अनंतराव देशमुख , डॉ सोपान दुट्टे आदींची उपस्थिती होती