Rakhi Sawant : मनोरंजन सृष्टीची (Entertainment Industry) ड्रामा क्वीन म्हणून ओळख असलेली अभिनेत्री राखी सावंत (Actress Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण ठरलं आहे ते मॉडेल शर्लिन चोप्रा (Shelyn Chopra) हीच प्रकरण. मॉडेल शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, अभिनेत्री राखी सावंतने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वास्तविक, शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राखी सावंतला ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर राखी सावंतने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाची मागणी केली. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे राखी सावंतच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता राखीने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
काय आहे प्रकरण
माॅडेल शर्लिन चोप्राने (Shelyn Chopra) राखी सावंतवर (Actress Rakhi Sawant) आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो लीक केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी राखीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करूनही ती हजर होत नसल्याने पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेत कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे राखी सावंतच्या अडचणी वाढल्या आहे.
Actor Rakhi Sawant files anticipatory bail petition in Bombay HC to avoid arrest.
Rakhi Sawant is accused of making female model’s objectionable videos & photos viral on internet. Case was registered against the actor after the model lodged complaint.
— ANI (@ANI) January 23, 2023
पतीमुळे राखी पुन्हा आली चर्चेत
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतीच ती ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर, आदिल खानसोबत गुपचूप लग्न करून धर्म परिवर्तन केल्यामुळे राखी सध्या खुप चर्चेत आहे. दरम्यान, तिच्या आईची प्रकृतीही खराब असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.