ग्रेट भेट : संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या अकराव्या वंशज अमृताताई मोरे व मुक्ताईनगर फडावरील किर्तनकार ह.भ.प सौ दुर्गाताई मराठे

IMG-20220517-WA0002

ग्रेट भेट : संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या अकराव्या वंशज अमृताताई मोरे व मुक्ताईनगर फडावरील किर्तनकार ह.भ.प सौ दुर्गाताई मराठे

[metaslider id="6181"]

मुक्ताईनगर : संत साहित्यिक सदानंद मोरे यांच्या कन्या तसेच संत श्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या अकराव्या वंशज असलेल्या अमृताताई मोरे यांनी आज जुनी कोथळी मुक्ताई मंदिरात आदिशक्ति मुक्ताईंचे दर्शन घेतले. याप्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र हरणे महाराज, जूनी कोथळी मंदिर व्यवस्थापक ह.भ.प.उद्धव महाराज जुनारे उपस्थित होते. यावेळी अमृताताई यांनी महिलांचा सप्ताह खूप छान झाला तो माझी माऊली चॅनल च्या माध्यमातून पाहिला खूप छान वाटले असे गौरवोद्गार काढले असता. लागलीच हरणे महाराज यांनी महिला सप्ताहाच्या संयोजक मुक्ताई फडावरिल कीर्तनकार ह.भ.प दुर्गाताई संतोष मराठे यांना कळविले असता त्यांनी लागलीच मुक्ताई मंदिर गाठले. येथे अमृताताई व दुर्गाताई यांच्यात सखोल अध्यात्मिक चर्चा झाली.
यावेळी रिंगण मासिकचे संपादक सचिन परब, सासवड येथील प्रसिद्ध कीर्तनकार तथा इंजिनियर ह भ. प अभय जगताप, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ. प रविंद हरणे महाराज, जूनी कोथळी मंदिर व्यवस्थापक ह.भ.प.उद्धव महाराज, ह भ प रतिराम महाराज आदींची उपस्थिती होती
**********************
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण –
आम्ही ज्या जगतगुरू तुकोबाराय यांचे अभंग घेवून कीर्तनात निरूपण करीत असतो आज त्यांच्या कुळातील अकराव्या वंशज अमृताताई मोरे यांचे आज प्रत्यक्ष दर्शन होत व त्यांच्याशी संवाद साधता आला त्या वेळेस असे वाटले की “धन्य आजी दिन संत दर्शनाचा | अनंत जन्माचा क्षीण गेला ||” अशी प्रतिक्रिया किर्तनकार ह भ प सौ दुर्गाताई संतोष माराठे यांनी व्यक्त केली.
************************

error: Content is protected !!