संत मुक्ताई अभंग 
पंढरपूर महात्म्यपर
अकार उकार मकार निःशुन्य साकार। 
परे परता परे पंढरिये ।।१।। 
अकार उकार मकार निःशुन्य साकार।
परे परता परे पंढरिये ।।१।।
ते रूप सावळे उभे कर कटी ।
पुंडलिका पाठी विटेवरी ॥२॥
भुवैकुंट क्षेत्र भिवरेचे तीरी |
संत भारगजरी टाळघोळ ||३||
दिंड्या गरुडटेक पतकांचे भार।
कीर्तन गजर वाळवंटी ||४||
निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता ।
जगमित्रादी तत्त्वता गाती नाम ॥५॥
मुक्ताई पूर्ण हरिपाठी रंगला ।
विठ्ठरातली पूर्णपणे ॥ ६ ॥
                                
	                            
                                                             
	    	














