आदिशक्ती मुक्ताई च्या पावन भूमीत हिंदुराष्ट्राचा जयघोष !
हिंदूंना अस्तित्व टिकवण्यासाठी संघटित होण्यावाचून पर्याय नाही ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
हिंदु युवकांनी संघटित होऊन, नियमितपणे धर्मासाठी काम केले पाहिजे – आमदार चंद्रकांत पाटील
*मुक्ताईनगर :* हिंदुबहुल देशात हिंदू महिला धर्मांधांपासून सुरक्षित नाहीत. त्यासाठी बहुसंख्य हिंदूंना मोर्चे काढावे लागत आहेत. हिंदूंची स्वमाता, गोमाता, मंदिरे यांवर आघात होताना दिसतात. राज्यात छत्रपतींचे गड दुर्गही आता जिहादी अतिक्रमणामुळे ग्रस्त होत आहेत. यामुळे येथून पुढे हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवणयासाठी तरी संघटित होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी केले. येथील हिंदुत्ववादी संघटनांनी कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिराजवळील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला युवा वर्गाच्या प्रचंड उत्साहात हिंदूराष्ट्राचा जयघोष करण्यात आला. यासह युवा शक्तिकडून मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात भव्य “हनुमान चालीसा” पठण करण्यात आली यावेळी आमदार चंद्रकांत पाटील आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी मुक्ताईनगर विधानसभा आमदार श्री. चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल पाटील, नगरसेवक संतोष मराठे ,हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री प्रशांत जुवेकर, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री मोहन तिवारी, यासह मुक्ताईनगर आणि बोदवड, तालुक्यातील हिंदु धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*जळगावच्या हिंदु राष्ट्र जागृती सभेला मुक्ताईनगर येथून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा केला निर्धार !*
या कार्यक्रमाला उपस्थित धर्मप्रेमी ना जळगाव येथे 25 डिसेंबर रोजी आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हा मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहू असा निर्धार सर्वांनी केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी सभेला जाण्यासाठी आवश्यक तेवढी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. आणि चंद्रकात पाटील म्हणाले की, हिंदु युवकांनी संघटित होऊन, नियमितपणे धर्मासाठी काम केले पाहिजे तर समाज खऱ्या अर्थाने जागृत होईल, असे आवाहन करून मोठया संख्येने हिंदु बांधव मुक्ताईनगर तालुक्यातून येणार असल्याचे सांगितले.