मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा, बोदवड व मुक्ताईनगर नगरपलिका क्षेत्रातील मुस्लिम बहुल वार्डातील विविध विकास २.५० कोटी कामांना मंजूरी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार अल्पसंख्याक विभागाकडून विकामे कामे मंजूर
मुक्ताईनगर : अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत मुक्ताईनगर संघातील नगरपालिका क्षेत्रात २.५० कोटी रुपयांची विविध विकास कामे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणी नुसार मंजूर झाली आहे अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.
अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा, मुक्ताईनगर व बोदवड नगरपालिका क्षेत्रातील मुस्लिम बहुल विविध वार्डातील विविध कामांना मंजूरी मिळाली असून यासंदर्भात शासन निर्णय , अल्पसंख्यांक विभाग, क्र. नाक्षेवि-२०२२/प्र. क्र.१३७/का-९ मुंबई दि.२ डिसेंबर २०२२ अन्वये परिपत्रक जाहीर झाले झाले आहे.
खालील प्रमाणे विकास कामाणांजुरी मिळाली असून सदरील कामांना सुमारे २५० लक्ष रू. निधी सह मंजुरी मिळाली आहे.
१) सावदा नगरपरिषद हद्दीत अल्पसंख्याक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे.(८० लक्ष)
२) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे.(९० लक्ष)
३)बोदवड नगरपंचायत हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे(८० लक्ष)