नरवेल ता.मुक्ताईनगर येथील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यावर धाडसी दरोडा !
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जखमी व्यापारी बांधवाची केली आस्टेवाईकपणे केली विचारपूस
मुक्ताईनगर : नरवेल ता.मुक्ताईनगर येथे निलेश(गोलु) वसंत सोनार यांचे उचंदा येथे सोने चांदीचे दुकान आहे. आज दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी दैनंदिन व्यवहार आटपून स ते राहते गाव नरवेल येथे रवाना झाले असताना अगदी नरवेल गाव हाकेच्या अंतरावर असताना सायं ६ :३० बाजेच्या सुमारास त्यांना मागून आलेल्या विना नंबर प्लेट पल्सर गाडी वरील तिघांनी त्यांची दुचाकी अडवून बेदम मारहाण केली व दुकानातील सोने चांदी चे सर्व दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लुटून नेला. तिघांनी टाकलेल्या या धाडसी दरोड्यात निलेश(गोलु) वसंत सोनार हे गंभीर जखमी झालेले असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली दाखल होत निलेश सोनार यांचे घरी जाऊन भेट दिली व सोनार कुटुंबीयांना धीर देत जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधुन दरोडेखोरांचा तात्काळ शोध घेवून त्यांना जेरबंद करण्यासाठी सुचना दिल्या.प्रसंगी सोबत गावकरी व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
