मुक्ताईनगर येथे मयत माकडावर ग्रामस्थांतर्फे अंतिम संस्कार, माणुसकी चे अनोखे दर्शन !
मुक्ताईनगर : शहरातील कुंभारवाडा परिसरात वृद्धपकाळाने अचानक मयत झालेल्या माकडावर माणुसकी धर्म पाळत शहरवासीयांनी विधिवत अंतिम संस्कार केल्याने तालुक्यात एक चर्चेचा व कुतूहलाचा विषय झालेला असून मानुकीचे अनोखे दर्शन या घटनेतून पाहायला मिळाले
शहरातील कुंभारवाडा परिसरात राहणारे पारस जैन व कोमल राजपूत यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी वृद्धपकाळाने एक माकड मृत अवस्थेत आढळून आले.सदर बाब शितल जैन यांनी वंदे मातरम ग्रुपचे धनंजय सापधरे यांना कळवले. त्यानंतर तात्काळ शुभम तळले, वैभव तळले, मधुकर सुरंगे, अजय भंगाळे, श्रीकांत दहिभाते, सोपान मराठे,गौरव कोळी, राजेंद्र वानखेडे आरोग्य विभाग समाधान कुंभार या तरुणांनी एकत्रित जमून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
बुलढाणा अर्बन व ओम साई सेवा फाऊंडेशनच्या स्वर्ग रथातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. विशेष म्हणजे हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे विधिवत अंतिम संस्कार करून माणुसकी जपली आहे.