*संघटनात्मक संरचनाच मुक्ती आंदोलनाला समाजात रुजवेल – राजेश पवार*
*महाविहार मुक्ती आंदोलनाचे जळगाव – बुलढाणा संयुक्त अधिवेशन संपन्न*
मुक्ताईनगर प्रतिनिधी : –
जागतिक बौद्धांचे अस्मिता स्थान असलेले बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी जगभरात खूप मोठमोठे आंदोलन सुरू आहेत. भावनिक होऊन लाखोंच्या संख्येने उभे राहिलेले आंदोलन जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी संघटनात्मक पध्दतीने लढा देऊन आंदोलन सफल करता येईल असे प्रतिपादन मुंबई विभाग मुख्य समन्वयक राजेश पवार यांनी केले.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्याचे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांचे संयुक्त अधिवेशन तालुक्यातील डोलारखेडा येथे १४ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य समन्वयक रवींद्र हिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मराठवाडा मुख्य समन्वयक सत्यजीत साळवे (छ. संभाजीनगर), संविधान प्रचारक सुभाष कांबळे (ठाणे), प्रदेश संघटक दिलीप इंगळे, बुलढाणा जिल्हा संघटक सुशील इंगळे, ज्येष्ठ पत्रकार मोहन मेढे, निवृत्त मेजर विनोद लहासे, मीडिया प्रभारी निवृत्त मेजर रतन डोंगरदिवे, देवानंद जाधव, सम्राट अशोक सामाजिक संघाचे अशोक निकम उपस्थित होते.
यावेळी सत्यजीत साळवे यांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास विशद केला. तर मोहन मेढे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील आंबेडकरी चळवळ आणि धम्म चळवळ सांगितली. भीमा कोरेगाव चा रणसंग्राम ज्यांनी इतिहासात कोरला त्या शूरवीरांच्या वंशजांवर महाबोधी महाविहार मुक्त करण्याची जबाबदारी असून संघर्षाचा इतिहास असलेल्या महाराष्ट्राने या लढ्याला यशस्वी करण्यासाठी एकसंघ होऊन ताकदीने लढले पाहिजे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद हिरोळे यांनी केले.
सूत्रसंचालन ऍड. राहुल लहासे यांनी तर आभारप्रदर्शन पंकज रोटे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ थाटे, शिवाजी वानखेडे, दुर्योधन सुरवाडे, सुरेश इंगळे, बाळू इंगळे, भरत वानखेडे, शिवाजी इंगळे, गणपत इंगळे, अनिल वाघ, पंकज हिरोळे, सुनील खराटे, राहुल इंगळे, प्रशांत हिरोळे, विनोद मोरे, अतुल हिरोळे, गौतम वाघ, आशिष हिरोळे, किशोर निकम, राजू निकम, अरुण वानखेडे, विनायक हिरोळे, आदित्य इंगळे व धम्म उपासिका महिला मंडळाने परिश्रम घेतले.