Pune Rave Party Case : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पतीला अटक, रोहिणी खडसेंची एका वाक्यात प्रतिक्रिया,
Rohini Khadse : राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई रेव्ह पार्टीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या हडपसर येथील राहत्या घराची झडती घेतली. अशातच आता यावर रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात रविवारी सकाळी खळबळ उडवणारी बातमी समोर आली होती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई एका रेव्ह पार्टीवेळी सापडले. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील खराडी येथील एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती. पोलिसांनी छापा टाकल्यावर खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या इतरांना अटक करण्यात आली आहे. राज्यात हनी ट्रॅप चर्चेत असताना मंत्री गिरीश महाजन आणि एकनाख खडसे यांच्या वार प्रतिवार सुरू आहेत. अशातच या प्रकरणावर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया आली आहे. रोहिणी खडसे यांनी आपला कायद्यावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल, जय महाराष्ट्र, अशी एका वाक्यात रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं आहे.पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोकेन, गाडी आणि २२ आणि २३ वर्षाच्या मुलीही तिथे असल्याचं समोर आलं आहे.
ती खरी रेव्ह पार्टी असेल, त्या रेव्ह पार्टीमध्ये आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणाने तपास करावा अशी अपेक्षा आहे. कारण पोलीस काहीही करु शकतात, अशी भावना जनमाणसात आहे. त्या संदर्भात नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट यायला पाहिजेत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
ही कारवाई खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमधील खोली क्रमांक १०२ मध्ये करण्यात आली. आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, १० मोबाइल, दोन कार, हुक्का पॉट आणि दारू, मोबाइल आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ४१ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. हडपसर), प्रसिद्ध बुकी निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, माळवाडी), समीर फकीर सय्यद (वय ४१, एनआयबीएम रस्ता), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, वाघोली), श्रीपाद मोहन यादव (वय २७, आकुर्डी), ईशा देवज्योत सिंग (वय २२, औंध), प्राची गोपाल शर्मा (वय २३, म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
रोहिणी खडसेंच्या या प्रतिक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटत कमेंट करा..