भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर! पुढील 48 तास निर्णायक; डोवाल बलाढ्य राष्ट्रांच्या संपर्कात

n66351820417467117000549e845cd8959d7fb70bc371475e9f8abf8552c6495b1ae4939ac02fac18972a5e

 

[metaslider id="6181"]

भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर! पुढील 48 तास निर्णायक; डोवाल बलाढ्य राष्ट्रांच्या संपर्कात

नवी दिल्ली | प्रतिनिधी
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या पुढील पावलांवर आहे. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक हालचाली वाढवल्या असून, पुढील 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.


मोदींचा दौरा रद्द – तणावाची तीव्रता लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 13 ते 17 मे दरम्यान नॉर्वे, नेदरलँड आणि क्रोएशिया दौरा नियोजित होता. मात्र, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा तात्काळ रद्द करण्यात आला आहे.


अजित डोवाल आंतरराष्ट्रीय संपर्कात, भारताची आक्रमक राजनैतिक खेळी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, सौदी अरेबिया, जपान, फ्रान्स यांसारख्या बलाढ्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी थेट संपर्क साधला आहे.

ज्यांच्याशी चर्चा झाली त्यात प्रमुख नेते:

  • अमेरिका: मार्को रुबीओ
  • चीन: वांग यी
  • रशिया: सर्गेई शोरगु
  • ब्रिटन: जीवनातन पॉवेल
  • सौदी अरेबिया: मुसेद अल ऐबान
  • UAE: तहानवून बिन झायेद अल नाह्यान
  • फ्रान्स: इमॅन्युअल बोन
  • जपान: मसाताका ओकानो

पाकिस्तानकडून अणुहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकी प्रतिक्रिया शक्य

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले.

  • मुरीदके – लष्कर ए तैयबाचे तळ
  • बहावलपूर – जैश ए मोहम्मदचे मुख्यालय
  • सियालकोट – हिजबुल मुजाहिदीनचा गड

हे हल्ले पाकिस्तानच्या सैनिकी प्रतिष्ठेवर गंभीर धक्का मानले जात असून, रावळपिंडीतील लष्करी नेतृत्वाकडून प्रत्युत्तराची शक्यता अधिक वाढली आहे.


ट्रम्प यांचे वक्तव्य – “जर मदत करता आली, तर मी तयार”

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,

“हे लज्जास्पद आहे… आम्हाला माहिती होती की काहीतरी होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष खूप जुना आहे. मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल. जर काही मदत करू शकलो तर मी नक्कीच पुढे येईन.”


भारताची भूमिका – ‘तणाव वाढविण्याचा हेतू नाही’

डोवाल यांनी स्पष्ट केलं की,

“भारताची कारवाई ही स्वसंरक्षण आणि आतंरिक सुरक्षेच्या रक्षणासाठी होती. तणाव वाढविण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, पाकिस्तानकडून जर तणाववाढीचे पावलं उचलली गेली, तर भारत प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण सज्ज आहे.”


संपादकीय विश्लेषण:

सध्या भारत जागतिक स्तरावर आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देत असून, युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य साधत आहे. मात्र, भारताचे राष्ट्रीय हित आणि सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे आणि त्यासाठी कोणतीही कारवाई करण्यास भारत सज्ज आहे.


 

error: Content is protected !!