Sunday, July 6, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह ऑडियो क्लिप, LCB चे निरीक्षक बकालेला तात्काळ बडतर्फ करा – मुक्ताईनगर मराठा समाज आक्रमक

शिवसेनेतर्फे देखील निवेदन देवून कारवाई ची मागणी करण्यात आली.

Admin by Admin
September 15, 2022
in जळगाव
0
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह ऑडियो क्लिप, LCB चे निरीक्षक बकालेला तात्काळ बडतर्फ करा – मुक्ताईनगर मराठा समाज आक्रमक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह ऑडियो क्लिप, LCB चे निरीक्षक बकालेला तात्काळ बडतर्फ करा – मुक्ताईनगर मराठा समाज आक्रमक
मुक्ताईनगर : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरड्या, अक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडियो क्लिप व्हायरल होताच क्लिप मधील संभाषण यावरून मराठा समाज जिल्हा भरात प्रचंड आक्रमक झाला असून ठीक ठिकाणी निवेदने दिली जात आहे. मुक्ताईनगर येथेही याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसून आले. मुक्ताईनगर तालुका मराठा समाजातर्फे निवेदन देवून जातीयवादी बकाले यास तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाईत दिरंगाई झाल्यास प्रचंड आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोलीस दलातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या (एल.सी.बी.) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरड्या, अक्षेपार्ह वक्तव्य केलेले असून त्याबाबतची दि. १३/०९/२०२२ रोजीची ऑडीओ क्लिप व्हायरल झालेली असून एक पोलीस निरीक्षकाने अशा महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त असतांना एखाद्या समाजाबद्दल बेताल वक्तव्य करुन संपूर्ण समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. तरी एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनात जर एखाद्या समाजाबद्दल इतका द्वेष, राग राहत असेल तर अशा अधिकाऱ्यांकडून सामाजिक न्यायाची. सुव्यवस्थेची काय अपेक्षा करता येईल. एवढ्या मोठ्या पदावरील जबाबदार व्यक्तीकडून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करुन कायद्याची स्वतः पायमल्लीच केलेली असून आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांकडून जो एखाद्या समाजाच्या विरोधात आहे, त्याकडून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रिद वाक्याची पुर्तता होणे शक्य नाही. तरी सदर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे पोलीस म्हणून जिथे कुठे कार्य करतील, तिथे मराठा समाजाबद्दल त्यांच्या आकस, द्वेष कायम राहील. म्हणून अशा पोलीस अधिकाऱ्यांची फक्त बदली करून काहीही होणार नाही. तरी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाल यांना व त्यांना समर्थन देणारे अशोक महाजन यांना त्वरीत निलंबन करण्यात येऊन कायमस्वरुपी सेवेतून” बडतर्फ” करण्यात येवून त्यांचे विरुद्ध सामाजिक भावना दुखाविल्याबाबत व महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियम, अटी व शर्तीचा भंग केला असल्याने त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आलेली आहे.
” मुळात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) जळगाव येथे अनुभवी व सेवा जेष्ठते नुसार पोलिस निरीक्षक पदाची होत असते परंतु या ठिकाणी कुठलाही अनुभव नसलेले बकाले यांची नियुक्ती कोणाच्या शिफारशी वरून झाली होती असा खडा सवाल उपस्थित करीत याप्रकरणी बकाले यांचेवर बडतर्फ व शिस्त भांगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले ”
यावेळी निवेदन देतेवेळी आमदार चंद्रकांत पाटील, मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, दिनेश कदम, संदीप बागुल, नरेंद्र गावंडे, दिलीप पाटील ( चोपडे), प्रफुल्ल पाटील, गणेश पाटील, ललित बाविस्कर, अविनाश बोरसे,साहेबराव पाटील,रमेश पाटील,किशोर पाटील,शिवाजी मराठे,गणेश पाटील,किरण महाजन, नगरसेवक संतोष मराठे , रविंद्र चव्हाण, राहुल शेळके, प्रदीप दांडगे, ad नीरज पाटील, जितेंद्र पाटील,चंद्रकांत मराठे निलेश पाटील,रोशन थोरात, दीपक कांदेले, सोपान मराठे, सचिन पाटील आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.

________________________________________

शिवसेनेतर्फे देखील निवेदन देवून तात्काळ बडतर्फ करण्याची केली मागणी –

  1. एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या डोक्यात जातीय वादाचे भूत असेल तर नक्कीच असला व्यक्ती समाजासाठी घातक असल्याचे म्हणत शिवसेनेतर्फे निवेदन देवून सदरील अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदन देतेवेळी आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई,सुनील पाटील, अफसर खान,राजेंद्र तळेले, नगरसेवक मुकेश वानखेडे, आरिफ आझाद, युनूस खान, बबलू कोळी, पियूष मोरे, वसंत भलभले, संतोष मराठे , राजेंद्र हिवराळे, निलेश शिरसाट , संदीप पाटील आदींसह असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post

आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न !

Next Post

संतभुमी मुक्ताईनगरी उद्या शुक्रवारी दि.१६ रोजी “यळकोट यळकोट जय मल्हार” च्या घोषणांचा आवाज घुमणार !

Admin

Admin

Next Post
संतभुमी मुक्ताईनगरी उद्या शुक्रवारी दि.१६ रोजी “यळकोट यळकोट जय मल्हार” च्या घोषणांचा आवाज घुमणार !

संतभुमी मुक्ताईनगरी उद्या शुक्रवारी दि.१६ रोजी "यळकोट यळकोट जय मल्हार" च्या घोषणांचा आवाज घुमणार !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group