जिजाऊ रथ यात्रेचे मुक्ताईनगरमध्ये भव्य स्वागत : घोषणांनी आसमंत दणाणला, शिवप्रेमींनी राजमातांना दिला मुजरा
मुक्ताईनगर (ता.२१ एप्रिल) – जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज दि.२१ एप्रिल रोजी मुक्ताईनगरमध्ये राजमाता जिजाऊ रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रवर्तन चौक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवप्रेमींचा मोठा उस्फूर्त सहभाग होता. रथासमोर शिवभक्तांनी मुजरा करत राजमाता जिजाऊंना नमन केले.
—
ठळक मुद्दे :
• प्रवर्तन चौकात जिजाऊ रथ यात्रेचे भव्य स्वागत
• फटाक्यांची आतिषबाजी, घोषणांनी परिसर दणाणला
• असंख्य शिवप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती
• महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण
४५ दिवसांच्या रथ यात्रेचा उद्देश – समाजजागृती आणि एकतेचा संदेश
—
राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे स्मरण आणि मराठा समाजात एकजूट निर्माण करण्याच्या हेतूने सुरु झालेली जिजाऊ रथ यात्रा आज मुक्ताईनगर येथे दाखल झाली. मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रवर्तन चौक येथे रथाचे आगमन होताच, शिवप्रेमींनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण भारावून टाकले.
या वेळी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास शिवप्रेमींनी मुजरा केला. त्यानंतर प्रवर्तन चौकातील शाहू, फुले, डॉ.आंबेडकर यांचे पुतळ्यांचे दर्शन घेऊन त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
—
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती :
या कार्यक्रमासाठी मुक्ताईनगर तालुका मराठा समाज अध्यक्ष अनंतराव देशमुख, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या कु. संजनाताई पाटील आणि पुत्र हर्षराज पाटील यांनीही यात्रेला शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक संतोष मराठे, बोदवड शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद धामोडे, सुभाष बनिये , रवी महाजन, युवराज पाटील ,धनंजय सापधरे, प्रमोद सोनवणे ,विजय काळे, डॉ. सोपान दुट्टे, पप्पू मराठे , सचिन सपकाळे, सुभाष धनगर , आनंदराव देशमुख सर ,निवृत्ती भड,गौरव दुट्टे, आकाश सापधरे, मंगेश घटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व शिवप्रेमींनी रथयात्रेचे स्वागत केले.
—
रथ यात्रेचा उद्देश :
ही यात्रा १८ मार्चपासून सुरु झाली असून एकूण ४५ दिवस चालणार आहे. महाराष्ट्रभर मराठा समाजात जागृती, महिला आणि युवकांचे प्रश्न, शेतकरीहित, सामाजिक सलोखा आणि संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करण्याचा हा उद्देश आहे. या रथ यात्रेच्या माध्यमातून समाजात ऐक्य, समतेचा संदेश दिला जात आहे.
यात्रा पुढे बोदवडकडे मार्गस्थ झाली असून, जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशाच उत्साहात तिचे स्वागत होणार आहे.
—
ही घटना केवळ एक धार्मिक वा सामाजिक सोहळा नसून, ती मराठा समाजाच्या संघटन व उभारणीचा निर्धारही अधोरेखित करते. जिजाऊ माऊलींच्या कार्याला नमन करत ही रथ यात्रा महाराष्ट्राला सामाजिक एकतेचा नवा संदेश देत आहे.
काही ठळक छायाचित्रे..