आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधत ,
उद्या मंगळवारी मुक्ताईनगरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा !
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर चे भाग्यविधाते ,दमदार कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भरघोस बक्षीसांनी विजेत्यांना पुरस्कार देवून गौविण्यात येणार असून स्पर्धेचे आयोजन सिद्ध करियर पॉईंट , मुक्ताईनगर यांचेतर्फे करण्यात आले आहे.
असे असतील पारितोषिक :-
प्रथम बक्षीस ११ हजार रू. व ट्रॉफी (प्रवीण चौधरी , मुकेशचंद्र वानखेडे,नगरसेवक) , द्वितीय बक्षीस – ५००० रू. व ट्रॉफी(छोटू भोई ,शिवसेना तालुका प्रमुख) तृतीय बक्षीस – ५००० रू. व ट्रॉफी(राजेंद्र हिवराळे,नगरसेवक तथा गटनेता)
————————————————————–
यांचे सहकार्याने :
नगरसेवक संतोष मराठे, सचिन (पिंटू) पाटील, स्वप्नील श्रीखंडे, जितेंद्र भोलाने, अवी अडकमोल, धीरज जावरे, सागर सनांसे, राहुल सनांसे, घनश्याम भोई, दीपक मोरे ,आनंद मराठे, साहिल इंगळे आदींचे अनमोल सहकार्याने ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे.
—————————————————————–
हे घेत आहे अथक परिश्रम :
सिद्ध करियर पॉईंट , मुक्ताईनगर चे अध्यक्ष सुहास जाधव, निखिल यमनेरे,आकाश तायडे , राहुल बोदडे, हेमराज सपकाळे आदी अथक परिश्रम घेत आहे.