विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन मुक्ताईनगर विभागा मार्फत 45 व्या वर्धापन दिनानिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न !
मुक्ताईनगर : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन मुक्ताईनगर विभागा मार्फत 45 व्या वर्धापन दिनानिमित्त व अमृत महोत्सव वर्षा निमित्त देवकांत साहेब यांच्या संकल्पनेतून 45+ प्लस रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रजेश गुप्ता (कार्यकारी अभियंता मुक्ताईनगर), प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप पाटील साहेब (झोन सचिव) , सचिन जावळे , डी.एन.माळी , सर्कल पदाधिकारी तसेच सर्व विभागीय व उपविभागीय आणि इतर कार्यकर्त्यांनी यशस्वी करता मदत केली. आज झालेल्या रक्तदानात एकूण 51 सभासद ,पदाधिकारी यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी रित्या संपन्न केले.