जळगांव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात होणारी हेळसांड पाहता
ग्रा. पं स्तरावर पदवीधर उमेदवार नियुक्त करून त्यांच्या मानधनाची तरतूद १५ व्या वित्त आयोगाने करावी आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी !
मुक्ताईनगर : जळगांव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. जिप च्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्या शाळांच्या ग्रापंचायतीना तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शैक्षणिक पदवीधारक उमेदवारांच्या नियुक्तीचे अधिकार देऊन, शिक्षकांचे मानधन केंद्र शासनाच्या ग्रा प स्तरावरील १५ वित्त आयोग या निधीतील २५% शिक्षण, उपजीविका तरतुदीतून शिक्षकांच्या मानधनाची तरतूद करण्यात यावी अशा मागणीचे पत्र मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी पंकज आशिया यांना दिले.
आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगांव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. जिप च्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्या शाळांच्या ग्रापंचायतीना तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शैक्षणिक पदवीधारक उमेदवारांच्या नियुक्तीचे अधिकार देऊन, शिक्षकांचे मानधन केंद्र शासनाच्या ग्रा प स्तरावरील १५ वित्त आयोग या निधीतील २५% शिक्षण, उपजीविका तरतुदीतून शिक्षकांच्या मानधनाची तरतूद केल्यास ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे त्यांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न सुटेल तरी जिल्हा परीषद, जळगाव प्रशासनाने १५ वा वित्त आयोगाच्या कृती आराखड्यातील तरतुदींबाबत गांभीर्याने विचार करावा व ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.














