Tuesday, October 28, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

कबरीचा वाद चिघळला!

Santosh Marathe by Santosh Marathe
March 18, 2025
in व्हायरल
0
nagpur-today-news
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूरच्या महल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. यावेळी प्रचंड दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

 छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb kabar) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केलं. त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं.

त्यानंतर पोलिसांनी सर्वांना परिसरातून पांगव. मात्र कालांतराने ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात जमाव पुन्हा त्याच परिसरात जमा झाला. यावेळी पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची कुमक कमी असल्याने पोलिसांना या जमावाला पांगवण्यात काहीसे अपयश आले. परिणामी पोलिसांनी पोलिसीबळाचा वापर केला असता जमावाकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली.

नागपुरातील घटनेत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? 

दरम्यान रात्री आठ वाजताच्या सुमारस चिटणीस पार्क चौकाकडून एक मोठा गट महालच्या परिसरात आला. तोपर्यंत गणेशपेठ पोलीस, कोतवाली पोलीस, इतवारी पोलीस स्टेशन शिवाय अधिकची पोलीस कुमक महाल आणि लगतच्या परिसरात तैनात करत या जमावाला पांगवले.  त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला. मात्र मुख्य रस्त्यावरील हा जमाव कालांतराने गल्लीबोळात शिरला आणि तिथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. यात अनेक दुचकी आणि कार जाळल्याची घटना घडली.

या राड्यात नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी काल रात्री गंभीर जखमी झाले असून त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते.  ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे, तेही रुग्णालयात दाखल आहे. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा मार बसला आहे मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत.

सध्या नागपुरातील परिस्थितीवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून महालसह परिसरात आज बंद पाळण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गरज नसल्यास घरा बाहेर न पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Previous Post

विविध कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रत्नागिरीत

Next Post

जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला

Santosh Marathe

Santosh Marathe

Next Post
जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला

जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group