मुक्ताईनगर प्रभाग १२ शिवरायनगर मध्ये शेकडो धर्मांधांचा राडा !
मुक्ताईनगर पोलिसात २०० दंगेखोरांवर दंगलीचे गुन्हे दाखल !
मुक्ताईनगर : एका तरुणीच्या बदनामी कारक व्हायरल पोष्ट वरून खडसे समर्थक नगरसेविकेच्या पुत्रास भर चौकात महिलांनी चोप दिल्याचे घटनेला
वेगळे वळण लागल्याने पोलिस स्टेशन मध्ये राष्ट्रवादीचे राजकीय ठिय्या आंदोलन व यानंतर याप्रकरणाला धार्मिकतेचा रंग देवून प्रवर्तन चौकात रोडावर झोपून आंदोलन होत असताना जमावाने पोलिसांना न जुमानता प्रवर्तन चौकातील दुकानदारांना बळजबरीने मार्केट बंद करण्याचे सत्र सुरू केले व १५० ते २०० च्या संख्येतील जमावची दिशा भरकटून जमावाने थेट प्रवर्तन चौका पासून जवळच असलेल्या प्रभाग क्र.१२ मधील शिवरायनगर व परिसरात लाठ्या काठ्या तलवारी, दगड , विटा हातात घेवून रहिवाशी परिसरात नारेबाजी करीत नागरिकांच्या घरावर लाठ्या काठ्या मारून तसेच दगड फेक करून दहशत माजविण्याच्या प्रयत्न करून येथील गोपाळ चौधरी यांचे घराच्या जिन्याच्या काचा फोडणे, महिलांना अर्वाच्य शिविगाळ करून दरवाजा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला.तसेच येथील एका घरावर चा सी सी टी व्ही कॅमेरा नासधूस करण्याचा प्रयत्न , एका महिलेला तर चक्क शिवीगाळ व मानेवर तलवार ठेवून जिंदा काट डालेंगे अशा धमक्या भरून त्या महिलेला पाठीत व हातावर बुक्के मारून खाली पाडले.तसेच एका मजुराला त्याच्या घरासमोर मोठा दगड मारून त्याचा पाय फ्रॅक्चर केला. यावेळी सुमारे १० मिनिटे चाललेला धर्मांधतेचा राडा पाहून नागरिक ही बाहेर पडताच सर्व धर्मांध दंगेखोर शेपूट घालून येथून पळून गेले.रात्री घटनास्थळी धाव घेत पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी पाहणी केली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. गेल्या ५० वर्षात असा प्रकार झालेला नसल्याने हलकट राजकारणाला बळी पडून तरुणीच्या बदनामी पोष्ट करणाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार खतपाणी यामुळे बळी ठरले ते निष्पाप नागरिक असे प्रकार करून मुक्ताईनगर च्या एकात्मतेला व शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका असा सुरू जनतेतून उमटत आहे.
याप्रकरणी गोपाळ चौधरी , रमेश भिवा कोळी, शकुंतला बाई अनिल भोई या तिघ रहिवाशांच्या फिर्यादीवरून १५० ते २०० अनोळखी दंगेखोरांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
**************
ज्यांच्याकडून खरेदी विक्री करतो, ज्या हातांनी मजुरीच्या माध्यमातून घरे बांधली गेली तेच हात आज गल्ली बोळात फिरून नागरिकांच्या घरांवर दगड फेक , लाठ्या काठ्या चालवत होते , अर्वाच्य शिवीगाळ करीत होते या गंभीर प्रकाराने मात्र नागरिक प्रचंड अवाक झाले असून नागरिकांच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया येथे उमटत होत्या.
*****************
हल्लेखोर धर्मांध की राजकारण्यांध होते याचा शोध घेऊन सर्वांना तात्काळ जेरबंद करावे व याचे कोणी सूत्रधार असल्यास त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.














