अमरावती, 7 मार्च (हिं.स.)वीजग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील जनता एकवटली असून स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी कृती समिती निर्माण झाली आहे. या समितीच्या वतीने सोमवार 10 मार्चला दु. १२ वा. विजग्राहक जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (इरविन चौक) अमरावती येथून निघून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंतांच्या कार्यालयावर धडक देणार आहे. यावेळी स्मार्ट /प्रीपेड मीटर अमान्य असल्याचे हजारो अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
विज ही मूलभूत गरज आहे हे दैनंदिन व्यवहाराने सिद्ध झाले आहे. त्यामध्ये होणाऱ्या बदलाचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होतो. जनसंख्येमध्ये 85% जन विभाग शेतकरी, शेतमजूर, कुशल अकुशल कामगार, असंघटित कामगार, जेमतेम जीवन जगणारा आहे. म्हणून याबाबतीत वीज ग्राहकांना खाजगी कंपन्यांच्या दावणीला बांधणे, त्याला नफ्याचे क्षेत्र बनविणे सरकारने आपली जबाबदारी नाकारणे हे समग्र भारतीय लोकशाही संकल्पनेच्या विरोधात आहे. सदर वीज जनमोर्चा मध्ये संयुक्त किसान मोर्चा, संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती, किसान आजादी आंदोलन महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा, राज्य सरकारी कर्मचारी संघटना
आयटक कामगार संघटना सीटू कामगार संघटना, भारतीय खेत मजदूर यूनियन, महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन लालबावटा, आम आदमी पक्ष किसान आघाडी आझाद समाज पार्टी, नवजागरण मनिशी व क्रांतिकारी स्मरण समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड किसान पुत्र आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संत्रा बागायतदार संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना आयटक अंगणवाडी कर्मचारी संघटना सिटु, भारतीय महिला फेडरेशन, जनवादी महिला संघटना, ऑल इंडिया युथ फेडरेशन, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन आदी संघटनांचा सहभाग आहे.
आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कॉ. तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, चंद्रकांत बानुबाकोडे, डी एस पवार, सुभाष पांडे , प्रा. साहेबराव विदळे, डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे , सतीश चौधरी, सुनील मेटकर, महादेव गारपवार,देविदास राऊतराऊत, शयाम शिदे, एच डी घोम, जे एम कोठारी, महेश जाधव, निळकंठ ढोके, रमेश सोनुले ,सुनीलभाऊ देशमुख, संजय मांडवदरे, सुनील घटाळे, दिलीपशापामोहन, नितीनगवळी, डॉ. अलीम पटेल, किरण गुडधे, गणेश मुंदरे, अश्विन चौधरी, डॉ प्रफुल्लगुडदे, मनीष पाटील प्रकाश दादा साबळे, चेतन परडके धनंजय तोटे, मीरा कैथवास, पद्माताई गजभिये, प्रफुल्ल देशमुख, वंदना बुरांडे, चित्राताई वंजारी, आशाताई वैद्य, सागर दुर्योधन, कैलास चव्हाण, किशोर शिदे, दीपकराव विदळे, उमेश बनसोड, प्रा.प्रसेनजीत तेलंग, ज्ञानेश्वर मेश्राम आदींनी केले आहे.