सटाणा, 4 मार्च (हिं.स.)।: शहरात राहणाऱ्या एका सावत्र बापाने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली असून, लैंगिक अत्याचारात मुलीच्या आईने मदत केल्यामुळे आईसह सावत्र बापाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन आईसह पित्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील मालेगांव रोडवर एका वस्तीमधील कुटुंबातील सावत्र बापानेच पत्नीच्या संगनमताने १५ वर्षीय मुलीवर गेल्या ६ महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी सावत्र बापाने दिल्यामुळे मुलीने अत्याचार निमूटपणे सहन केला. मात्र, असह्य झाल्याने अखेरीस मुलीने पोलिस स्टेशन गाठून घडत असलेल्या सर्व ग प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सावत्र बापासह त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुलीच्या जबाबावरून व वैद्यकीय अहवालावरून सावत्र बापासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला.