आमदार चंद्रकांत पाटील यांना मराठा भुषण पुरस्कार जाहीर !
उद्या दि.९ जुलै रोजी जळगाव येथे  केले जाणार पुरस्काराने सन्मानित !!
जळगाव येथे गुजराल पेट्रोल पंपाजवळील निवृत्ती नगर मधील मराठा भवन येथे जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने दि.९ व १० जुलै अशा दोन दिवसीय आयोजित केंद्रीय कार्यकारिणी आढावा बैठकित मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील रत्नांना “मराठा भुषण पुरस्कार” देवून गौरविण्यात येणार असून यात चार लोकप्रतिनिधींचा समावेश असून त्यातील एक मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांचाही समावेश आहे.  आमदार चंद्रकांत पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सोशल मीडियातून. त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
        तर यात आणखीन विशेष म्हणजे खान्देश पुत्र गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार सी आर पाटील, बुऱ्हाणपूर खासदार ज्ञानेश्वर पाटील आणि चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण या इतर तिघांना देखील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या मान्यवरांचे शुभहस्ते होणार पुरस्काराचे वितरण :
   मराठा सेवा संघाचे राज्याध्यक्ष विजय घोगरे, राज्य महासचिव मधुकर मेहकरे, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, राष्ट्रिय अध्यक्ष तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद सुनील महाजन, मराठा सेवा संघ राज्य उपाध्यक्ष अरविंद गावंडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन व संपर्क :
मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, मराठा सेवा संघ जिल्हा प्रचारक दिनेश कदम, मराठा सेवा संघ महानगराध्यक्ष हिरामण चव्हाण, जिल्हा सचिव संजय पाटील, चंद्रकांत देसले, उल्हास पाटील आदींनी केले असून या कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय आढावा बैठक होत मराठा सेवा संघाचे कार्य कक्षेचे विस्तारीकरण व प्रचारावर चर्चा होणार आहे.
पुरस्कार व सत्कर मूर्ती आमदार चंद्रकांत पाटील :
     मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील बहु संख्येने बाहुबली असलेल्या मराठा समाजाला व समाजातील गोरगरीब समाज बांधवाना मुला मुलींचे लग्नासाठी महागडे मंगल कार्यालय, समाजाच्या बैठका व कार्यक्रमांसाठी हक्काची वास्तूचं नव्हती ही बाब गेल्या अनेक वर्षापासून असून याकरिता हक्काचे मंगल कार्यालय व्हावे अशी मुक्ताईनगर व बोदवड येथे मागणी होत होती परंतु याकडे तत्कालीन लोकांनी लक्षच दिले नाही. परंतु हाच धागा पकडून मुक्ताईनगर येथील मराठा समजातील ज्येष्ठ व काही होतकरू तरुणांनी  हक्काचे मंगल कार्यालय उभे राहावे यासाठी राजे लखुजीराव बहुद्देशीय मराठा समाज संस्थेची स्थापना केली. यातही संचालक म्हणून आमदार चंद्रकांत पाटील आहेत. आमदार पाटील यांनी वेळोवेळी समाजाच्या कार्यात या संस्थेच्या माध्यमातून सहभाग नोंदवला तसेच आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते नेहमी दोन पावले पुढे असतात. विशेष म्हणजे त्यांनी नुकतेच मुक्ताईनगर व बोदवड येथे तत्कालीन नगरविकास मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या माध्यमातून (प्रत्येकी ७० लक्ष रू) सुमारे १ कोटी ४०  लक्ष रू.च्या भरीव निधी च्या तरतुदी सह भव्य मंगल कार्यालय मंजूर केले. यासह आमदार पाटील यांनी बोदवड येथे माळी समाजासाठी, मुक्ताईनगर येथे कोळी व बौध्द समाजासाठी, तसेच सावदा व मुक्ताईनगर येथे मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाना हॉल, जूनेगावं नागेश्वर मंदिर येथे जूनेगावतील गोरगरीब जनता व सर्व बारा बलुतेदार समाजातील बांधवांसाठी भव्य मंगल कार्यालय बांधकाम पुर्णत्वास येत आहे अशा धर्तीवर त्यांचे सर्वांसाठी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून कार्य सुरू असून या होतकरू तडफदार लोकप्रतिनिधी कडून भविष्यात आणखी जास्तीत जास्त लोक. हिताचे कामे होवो याच सदिच्छा ! खऱ्या अर्थाने पुरस्काराची निर्मिती अशाच अशाच गुणवान लोकांना मिळाल्यास त्या पुरस्काराची उंची वाढत असते. मराठा सेवा संघाचे योग्य निरीक्षण केल्याने मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी देखील लक्ष लक्ष शुभेच्छा !
                                
	                            
                                                             
	    	














