अमरावती, 3 मार्च
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील टवाळखोर एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. आता छेडछाड प्रकरणावरून माजी खासदार नवनीत राणा यांनीही या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
नवनीत राणा यांनी काय म्हटलं आहे ?
“तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या. पण असे प्रकार नका, हात जोडून विनंती करते. राजकारण गेलं खड्ड्यात, जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भरचौकात आणून त्यांना फाशी द्यावी. व जर राजकीय व्यक्ती असे करत असतील तर हे खूप निदनीय गोष्ट आहे. आमचे गृहमंत्री कडक कारवाई करणार आहेत. मुलगी कोणाचीही असो. ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहणार”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.