मुक्ताईनगर येथे दुचाकी व कारच्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी !
मुक्ताईनगर शहरातील बोदवड रस्त्यावरील हायवे जवळील राजस्थानी मार्बल जवळ चार चाकी कारच्या धडकेत झालेल्या दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना 30 रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली.
मुक्ताईनगर नगरपंचायत चे कर्मचारी मयूर रवींद्र महाजन व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अतुल वराडे दोघे हे मोटरसायकल क्रमांक MH 19 AL 5343 बोदवड रस्त्यावरील राजस्थानी मार्बल ते साई वाशिंग सेंटरच्या दरम्यान जात असताना त्यांना चार चाकी कार क्रमांक MH 20 CH 0546 ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुक्ताईनगर नगरपंचायत कर्मचारी मयूर रवींद्र महाजन वय 33 तर अतुल एकनाथ वराडे वय 30 हे गंभीर जखमी झाले होते.
दोघांची प्रकृती चिंताजनक गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे प्राथमिक उपचार करून दोघांना तात्काळ पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले . परंतु नगरपंचायत कर्मचारी मयूर महाजन यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली .
दरम्यान मयूर महाजन हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे पश्चात आई वडील दोन बहिणी पत्नी दोन वर्षाची लहान मुलगी सुद्धा आहे. मयूर महाजन यांच्या निधनामुळे मुक्ताईनगर शहरात एकच शोककळा पसरली आहे. सर्वांकडून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार राम मोहन हंबर्डे राहणार मलकापूर या चार चाकी वरील चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करत आहेत.