संत मुक्ताई दरबारात, संजय महाराज पाचपोर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न !
महाराष्ट्र शासन, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 या पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित झालेले वारकरी भुषण हरिभक्त परायण गुरुवर्य संजय महाराज पाचपोर यांचा “भव्य सत्कार सोहळा” दि.२८ सप्टेंबर २०२४ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता इंदिरा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत श्री.संत मुक्ताई समाधी स्थळ,श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जुने मंदिर) येथे पार पडला.
यावेळी बोलताना संजय महाराज पाचपोर यांनी मी संत मुक्ताई फडावरील सेवकेरी असून आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांच्या कृपा आशीर्वादाने हा पुरस्कार मिळाला ,खरे तर माझी पात्रता नसताना देखील केवळ संत मुक्ताई साहेबांचा कृपा आशीर्वाद असल्याने हे शक्य झाले. पुरस्कार मिळाल्याने सर्वच ठिकाणी सत्कार होत आहेत . परंतु इथला सत्कार हा आई साहेबांनी केल्याचा भाव मनात येत असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली.
यावेळी श्री.संत मुक्ताई संस्थान, श्रीक्षेत्र मुक्ताईनगर जि.जळगाव अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, आ.चंद्रकांत पाटील , माफदाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद तराळ, संत मुक्ताई संस्थान विश्वस्त पंजाबराव पाटील , सम्राट पाटील , संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जूने मंदिर व्यवस्थापक उद्धव जूनारे महाराज , विशाल महाराज खोले, विजय महाराज खवले , नितीन महाराज , लखन महाराज , पंकज महाराज , रतिराम महाराज , शेखर वानखेडे महाराज , निवृत्ती पाटील , कृष्णा महाराज , वाघोदे महाराज यांच्या फडावरील किर्तनकार, कथाकार , टाळकरी, व फडकरी तसेच वारकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.