मुक्ताईनगर तालुका मराठा समाजा कडुन ग्रामसेवक योगेश घाटे यांचा सत्कार सोहळा संपन्न
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील ग्रामसेवक श्री. योगेश घाटे यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यास मंत्री महोदय व अधिकारी मान्यवर मंडळी उपस्थित होती. ग्रामसेवक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांतूनही गौरव करण्यात आला आहे.
सन्मान प्राप्त झाल्यानंतर, त्यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. उचंदा घाटे एस विद्यालयाचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे उपाध्यक्ष माणिकराव जगन्नाथ पाटील यांचे चिरंजीव असलेल्या ग्रामसेवक योगेश पाटील घाटे यांना मिळालेल्या या आदर्श पुरस्कारामुळे गावात आनंदाचे वातावरण होते.
या प्रसंगी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी योगेश घाटे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, राष्ट्रीय मराठा वस्तीग्रह कक्ष चे अध्यक्ष दिनेश कदम, दूध डेरीचे चेअरमन संतोष देविदास पाटील,राजु पाटील .सौरभ पाटील. शिवसेना शाखा अध्यक्ष संदीप जगन्नाथ पाटील, रामदास भोलाणे आणि गावातील इतर ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. या सर्व मान्यवरांनी योगेश घाटे यांच्या यशस्वी कार्याचा गौरव करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामसेवक योगेश घाटे यांनी त्यांच्या कामाचे श्रेय गावकऱ्यांच्या सहकार्याला दिले आणि आपल्या गावाच्या विकासासाठी आणखी तत्पर राहण्याची ग्वाही दिली.