युनिक शाळेत 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

मुक्ताईनगर विधानसभेचे माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची कन्या कु.संजना चंद्रकांत पाटील व कु. हर्षराज चंद्रकांत पाटील यांनी युनिक इंटरनॅशनल शाळेत ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
प्रसंगी शाळेचे संचालक श्री.निलेशजी सावळे सर (इन्फिनिटी कोचिंग क्लासेस मुक्ताईनगर) , श्री.शरदजी भालेराव सर, श्री महेंद्र बोदडे सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे, माननीय आमदार श्री. चंद्रकांत भाऊ पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. प्रशांतजी पाटील , शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.मासुळे सर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व पालकांनी योगदान दिले.
डॉ. तेजश्री हर्षल पाटील (दंत रोग तज्ञ) यांनी पालकांना पालकत्वाबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रीना महादेव इंगळे यांनी यशस्वीपणे केले.