संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा, दिमाखात संपन्न
भव्य वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धेने वेधले लक्ष, शेकडो भजनी मंडळांनी फुलविला भक्तीचा मळा
युट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी Click Here
फेसबुक व्हिडिओ पाहण्यासाठी Click Here
मुक्ताईनगर. श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथून आषाढी वारी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली आई साहेबांची पालखीचे शनिवारी दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी स्वस्थळी आगमन झाले. त्यानिमित्य दि.१० ऑगस्ट रोजी पालखी सोहळा उत्सव समिती व नागरिकांच्या उस्फुर्त सहभागाने डोळ्यांचे पारणे फेडणारी भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेच आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेतील शेकडो भजनी मंडळांनी भक्तीचा मळा फुलवून संत भूमी मुक्ताईनगरी ला टाळ मृदंग व हरिनामाच्या गजराने पुलकित केले होते.
शेकडो वर्षाची परंपरा जोपासत वारकरी संप्रदायातील मानाचा संत मुक्ताई पालखी सोहळा श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर व परत प्रदीर्घ ६५ दिवसांच्या प्रवासानंतर शनिवारी मुक्ताईनगरीत दाखल झाला. त्यानिमित्त दि.१० ऑगस्ट रोजी रविवारी नवीन मंदिर ते समाधी स्थळ जुने मंदिर पर्यंत मुक्ताईनगर शहरातून भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
भर पावसात भिजत नवीन मंदिर येथून सकाळी दहा वाजता स्पर्धेला सुरुवात होऊन मुख्य रस्त्याने बस स्टॅन्ड प्रवर्तन चौक , गजानन महाराज मंदिर आस्थानगरी मार्गे जुने मंदिर येथे सोहळ्याचा समारोप झाला.
भर पावसातही दिसून आला उत्साह
भर पावसातही भक्तीचा मळा फुळलेलाच दिसून आला , स्पर्धेत सहभागी भजनी मंडळांनी टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन सर्वांचे लक्ष वेधले होते.
सजीव देखावा
पिप्री आकराऊत येथील भजनी मंडळाने संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्या मुखी वेद वदविण्याचे सचित्र सजीव देखावा करून सर्वांचे लक्ष वेधले तर , मुक्ताईनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर मधील पथकाने भिंत चालविण्याचा सजीव देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती.
लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी यांचेतर्फे सत्कार
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संत मुक्ताई पालखीचे दर्शन घेतले तर त्यांनी भुसावळ रोडवर भाजप पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात आगमन सोहळ्यात सहभागी दिड्यांचा सत्कार केला. तर प्रवर्तन चौकात शिवसेना परिवार तर्फे आयोजित कार्यक्रमात आ.चंद्रकांत पाटील यांचेतर्फे प्रत्येक दिंडीचा सत्कार आणि प्रोत्साहनपर रोख बक्षीस देवून शेकडो दिंडी सोहळ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात महिला प्रदेश अध्यक्षा ऍड रोहिणी खडसे – खेवलकर यांनी हरिपाठ व नित्य सेवेची दिनदर्शिका देवून प्रत्येक दिंडी चा सत्कार केला. यासह विधानसभा उमेदवारी साठी चर्चेत आलेले ठेकेदार विनोद सोनवणे यांच्याकडून अश्वारूढ सजीव देखावा तसेच कागदी पुष्पवृष्टी तोफ द्वारे पालखीचे स्वागत करण्यात आले. सोबतच काँग्रेस नेते डॉ जगदिश पाटील, बुऱ्हाणपूर येथील माजी मंत्री आ. अर्चना चिटणीस , बोदवड कृषी बाजार समिती सभापती सुधीर तराळ यांचेसह विविध राजकीय पदाधिकारी यांनी दर्शन घेतले.
पालखी सोहळ्यात नणंद – भावजय ने लेझीम पथकात –
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे – खेवलकर यांनी शाळकरी मुलींच्या लेझीम पथकात लेझीम खेळण्याचा आनंद घेतला.
हा व्हिडिओ पाहण्यासाठी Click Here