मुक्ताईनगर जवळ एस टी बसचा अपघात,
८ जण जखमी
आमदारांची टीम धावली मदतीला !
मुक्ताईनगर आगाराची बस , जामनेर येथून मुक्ताईनगर कडे ८ प्रवासी घेवून येत असताना मुक्ताईनगर नर्सरी जवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना दि.५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजेच्या दरम्यान घडली
दरम्यान सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर आगाराची बस क्र MH 19 8711वरील चालक सुनिल दामोदरे, वाहक वाय एफ तांबे हे जामनेर येथून मुक्ताईनगर कडे ८ प्रवासी घेवून येत असताना मुक्ताईनगर नर्सरी जवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
सदरील घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच दोन रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिल्या तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, शहरप्रमुख गणेश टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील ,वैद्यकीय आघाडी जिल्हा प्रमुख पवन सोनवणे, नगरसेवक संतोष कोळी, पीयूष मोरे, आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी तसेच इतर सर्व पदाधिकारी यांनी लागलीच घटनास्थळ गाठले आणि जखमी रुग्णांना ,रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणले असता सर्व रुग्णांवर प्राथमिक करण्यात आले तर दोघे गंभीर जखमी रुग्णांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमी रुग्णांची विचारपूस केली.उपचाराचा आढावा घेतला तर लागलीच भ्रमणनीवरून विभागीय नियंत्रकांशी चर्चा केल्याने बसमधील सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ १ हजार रुपयाची मदत देण्यात आली.तर दोघे गंभीर जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार केल्यास सर्व खर्च एस टी महामंडळ करणार आहे .