वडगांव (महालखेडा) ता.मुक्ताईनगर येथील हेमाडपंथी श्री.महादेव मंदिर देवस्थानास “क” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव (महालखेडा) येथील प्राचीन हेमाडपंथी
श्री. महादेव मंदिर असून येथे अनेक ऋषी मुनींनी खडतर तप करून ईश्वराची प्राप्ती केल्याची अख्यायिका असल्याने या मंदिरात महादेवाची पूजा व उपासना करणे व दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. येथे दरदिवसाला व यात्रोत्सव काळात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे भाविकांना सुविधा मिळत नसल्याने या मंदिराला “क” वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे आज दि.१७ जून २०२२ शुक्रवार रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्रव्यवहार करून मागणी केल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बैठकीत मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव (महालखेडा) येथील प्राचीन हेमाडपंथी श्री. महादेव मंदिर या देवस्थानास
“क” वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा ला मान्यता दिली आहे.
यामुळे आता या मंदिर परिसरात भक्त निवास, प्रसादालय, सभामंडप, स्वच्छता गृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभिकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात येतील. त्यामुळे राज्यभरातील भाविक या ठिकाणी अधिक मोठ्या संख्येने येत असतात. या भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या यासाठी या देवस्थानास क वर्ग दर्जा प्राप्त व्हावा याकरिता आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा सुरू होता.या पाठपुराव्याला यश आले असून भाविक व परिसरातील नागरिकां तर्फे आनंद व्यक्त होत असून आमदारांचे आभाराचे पोष्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून सर्वच स्तरातून कौतुक व्यक्त केले जात आहे.