तिर्थक्षेत्र मुक्ताईनगरीत श्री.स्वामी समर्थ केंद्राच्या भव्य वास्तूचे भूमिपूजन !
गुरूपौर्णिमा शुभ मुहूर्तावर आ.चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सोहळा संपन्न
युट्यूब व्हिडिओ लिंक Click Here
फेसबुक व्हिडिओ लिंक Click Here
जय मुक्ताई
|| श्री.स्वामी समर्थ ||
मी संतोष मराठे मुक्ताई वार्ता चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करतो..
आता वळूया बातमीकडे
आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे शिवरायनगर प्रभाग क्र.१२ मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर दिंडोरी प्रणित,श्री स्वामी समर्थ केंद्राच्या भव्य वास्तूचे, मराठी तिथी शके १९४६, क्रोधी संवत्सर मास पक्ष आषाढ शुक्लपक्ष तिथि गुरूपौर्णिमा दि.२१ जुलै २०२४ वार रविवार या शुभ मुहूर्तावर प्रात:स्मरणीय परम पूज्य गुरू माउली यांच्या आज्ञेनुसार, वास्तू बांधकाम शुभारंभ व विशेष पूजन विधी सकाळी पार पडली. यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, उपजिल्हा संघटक पंकज कोळी