मुक्ताईनगर येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशोत्सव व पालक संपर्क अभियानाचे आमदार चंद्रकात पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मुक्ताईनगर : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नंबर एक व कन्या शाळा मुक्ताईनगर येथे शाळा प्रवेशोत्सव व पालक संपर्क अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप सुद्धा करण्यात आले यावेळेला शाळापूर्व तयारी अभियान व पालक संपर्क अभियान याबाबत प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बी डी धाडी यांनी केले. तसेच उपस्थित पालकांना आमदार पाटील यांनी मार्गदर्शन केले व जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व विशद केले त्याचप्रमाणे मी याच शाळेत शिकलेला आहे असे शाळेबद्दल गौरवपूर्ण उदगार काढून दोघही शाळेतील शिक्षकांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार केला. भावना व्यक्त करताना व शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. पहिल्यांदाच शाळा सुरू होण्याच्या दिवशी आमदारांनी शिक्षकांचा सत्कार केल्यामुळे शिक्षकांचे ही मन भरून आले व पहिल्यांदाच असा सत्कार करण्यात आला असं शिक्षकांमधून भावना व्यक्त केली.
शाळेची गुणवत्ता कशी वाढेल या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आमदार पाटील यांनी भावना व्यक्त केली त्याचप्रमाणे या शाळेचा पाईक असल्या कारणाने मॉडेल स्कुल साठी एक कोटी रुपये मंजुरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्यावेळी सर्वांनी आनंद टाळ्या वाजून व्यक्त केला.
प्रसंगी गटशिक्षणाधिकारी बी डी धाडी , श्री. तडवी तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, शहर प्रमुख गणेश टोंगे ,नगरसेवक संतोष (बबलू) कोळी निलेश शिरसाठ राजेंद्र हिवराळे संतोष मराठे दिलीप पाटील सर, अफसर खान, गोपाळ सोनवणे, दीपक नाईक, शकुर जमदार , जाफर अली, राजेंद्र तळेले, देवानंद वंजारी, महेबुब मिस्तरी , बी आर खान,संतोष माळी व इतर कार्यकर्ते हजर होते. पी ए प्रवीण चौधरी व प्रशांत हजर होते.
पहिल्याच दिवशी शिक्षकांचा सत्कार :
शिक्षक ग्रेड मुख्याध्यापक धनलाल भोई, शिक्षिका अरुणाताई घुले , चंद्रकलाताई घुले, गणेश कडू भगत, वर्षाताई चौधरी ,गंगाताई वाडेकर, लीनाताई खरे, स्नेहाताई लभाने, दिलीप पाटील, भीमराव पवार ,राजू ईश्वरे, सुनील आढागळे, देवानंद झनके आदी शिक्षकांचा शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आमदारांनी सत्कार केला. व मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कल वाढवावा अशा शूभेच्छा दिल्या.