शिवसेना रावेर तालुका कार्यकारणी जाहीर;
पहा कोणाची नियुक्ती झाली ?
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील शिवसेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. शिवसेनेत इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रवेश केला असून आता पदाधिकारी निवड जाहीर करण्यात येत आहेत.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी खालील कार्यकारणीस मान्यता दिली असून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली.
रावेर तालुका कार्यकारिणी
रावेर तालुका संघटक :- उमेश नारायण वरणकर (कार्यक्षेत्र रावेर विधानसभा) मो.९०४९८३०३०९
रावेर उपतालुका प्रमुख : अनिल भगवान महाजन (कार्यक्षेत्र मस्कावद थोरगव्हान गट रावेर तालुका) मो.७५५८३८७१५६
रावेर उपतालुका प्रमुख प्रशांत बाबुराव पाटील (कार्यक्षेत्र निंभोरा तांदलवाडी गट) मो. ९९२२८५०४८८
रावेर शहर प्रमुख :- नितीन एकनाथ महाजन (कार्यक्षेत्र रावेर शहर) मो. ८७८८१२७५५०
निभोरे बु. शहर प्रमुख :- दुर्गेश युवराज नेहते (कार्यक्षेत्र निभोरा बु. ता. रावेर) मो.८८३०७९१०८१
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्ष निरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, महिला संपर्कप्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन जिल्हा संघटक सुनील पाटील, जिल्हा समन्वयक प्रविण पंडित , उपजिल्हाप्रमुख योगेश पाटील, तालुका प्रमुख यशवंत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख कुणाल बागरे यांनी अभिनंदन केले आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वय दिली आहे.