मुक्ताईनगर तालुक्यातील ४८ सिमेंट काँक्रिट नाला बांध कामांसाठी १४ कोटी रु. निधी सह मंजूरी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीतून जास्तीत जास्त लाभ सिंचनाचा लाभ होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सिंचन विभागाच्या प्रशासकिय कामाकाजात दुर्लक्षित असलेल्या भागात म्हणजेच तालुक्यातील सुमारे १४ गावांजवळ विविध ४८ ठिकाणच्या ग्रेटेड सिमेंट काँक्रिट बंधारे/ साठवण तलाव बांधकामासाठी मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा अशा मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्याने या कामांसाठी १४ कोटी रुपये निधी सह मंजुरी मिळाली असून यासंदर्भातील प्रशासकिय मान्यतेचे परिपत्रक दि.१० जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आले आहे.
या गावांचा आहे समावेश :
सुकळी, वढोदा, चिचखेडा बू, नायगाव, धाबे, पिप्रीपंचम, बोदवड, भोटे, थेरोळा, टाकळी, महालखेडा, तालखेडा, निमखेडी बू. , चिचखेडा खु. अशा प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यांतील एकूण १४ गावांतील विविध ठिकाणच्या ४८ कामांचा समावेश आहे.
दरम्यान, एक महिन्याआधी बोदवड तालुक्यातील ग्रेटेड सिमेंट काँक्रिट बंधारे/ साठवण तलाव बांधकामासाठी रू. ५ कोटी रुपये निधी सह मंजूर मिळालेली आहे.