युवा सेना रावेर तालुका प्रमुख पदी कोणाची लागली वर्णी
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील युवा सेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली शिवसेनेत इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसेच युवानेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रवेश केला असून आता काही पदाधिकारी निवड करण्यात आली आहे.
हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना विभागीय निरीक्षक अभिषेक चौधरी यांनी यांनी खालील कार्यकारणीस मान्यता दिलेली असून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकार व जाहीर केली आहे.
बोदवड युवा सेना कार्यकारणी
तालुकाप्रमुख – शुभम चौधरी