सावद्यात खतांचे रॅक लागणे तसेच नाडगावात रेल्वेना थांबा मिळावा – आ.चंद्रकांत पाटील
Use Translator
Indian Relve रेल्वे मंडळ प्रबंधक कार्यालय,भुसावल येथे रेल्वे मंडळातील विविध प्रश्न संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला आ.चंद्रकांत पाटील (MLA.Chandrakant N Patil) यांनी उपस्थित राहून, निंभोरा येथील रेल्वे उड्डाणपूल लागत प्रश्नसंदर्भात तसेच सावदा रेल्वे येथे खतांचे रॅक लागण्या संदर्भात आणि नाडगाव ता.बोदवड येथील रेल्वे Under Pass उड्डाणपूलाच्या विविध अडचणी व तक्रारी तसेच नवजीवन व सेवाग्राम एक्सप्रेस तसेच सुरत पॅसेंजरला थांबा मिळावा आदी प्रमुख मागण्यांसंदर्भात भुसावळ रेल्वे प्रबंधक अधिकारी ‘इतीजी पाण्डेय’ यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
‘याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री (Minister) गिरीश महाजन (Girish Mahajan )जळगाव खा.स्मिताताई वाघ (MP Smita Vagh),आ.संजय सावकारे (MLA.Sanjay Savkare) आ.मंगेश चव्हाण MLA Mangesh Chavhan, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील (Navnit Patil) तसेच भुसावळ रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.